किचनमधील काम पटापट उरकायची म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या उपकरणांची गरज लागते. आपल्या किचनमध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात ज्यांचा वापर करुन आपण नेहमीची काम अतिशय झटपट सोप्या पद्धतीने करु शकतो. आपल्या किचनमध्ये लाकडाचा किंवा प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड (How do I keep my cutting board from slipping?) हा असतोच. फळे, भाजीपाला कापण्यासाठी आपण या चॉपिंग बोर्डचा वापर करतो. या चॉपिंग बोर्डचा ( 4 Ways to Keep Your Cutting Board from Slipping) वापर करून फळे, भाजीपाला आपल्याला हव्या त्या प्रकारांत कापता किंवा चिरता येतात(How To Stabilize A Cutting Board - Slice).
'चॉपिंग बोर्ड' (How to Prevent Your Cutting Board From Sliding) ही किचनमधील अतिशय फायद्याची एक वस्तू आहे. याचा वापर आपण रोजचा स्वयंपाक करताना हमखास करतोच. चॉपिंग बोर्डचा वापर केल्याने घाई - गडबडीचाच्यावेळी फळे, भाज्या अतिशय झटपट चिरुन, कापून होतात. परंतु या चॉपिंग बोर्डचा वापर करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काहीवेळा या चॉपिंग बोर्डवर फळे, भाज्या चिरताना तो सरकतो (Kitchen Tips: 4 Easy Ways To Keep Cutting Board From Slipping) किंवा पटकन सटकू शकतो. अशावेळी आपला हात किंवा बोट कापले जाण्याची भीती असते. असे होऊ नये म्हणून खास काळजी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत, फळे, भाज्या चिरताना हा चॉपिंग बोर्ड जागचा हलू नये म्हणून काही सोप्या टिप्स फॉलो करुयात(Chopping Board Slipping And Sliding ? 4 Genius Hacks to Keep It Steady).
चॉपिंगबोर्डवर काही कापताना तो एका जागी स्थिर ठेवण्यासाठी टिप्स...
१. चॉपिंग बोर्डचा वापर करताना तो न सरकता एका जागीच स्थिर रहावा यासाठी आपण टिश्यू पेपरचा वापर करु शकतो. टिश्यू पेपरचा एक मोठा तुकडा घेऊन तो ओट्यावर अंथरून घ्यावा. त्यावर किंचितसे पाणी शिंपडून तो ओला करुन घ्यावा. आता त्यावर चॉपिंग बोर्ड ठेवावा. या ट्रिकचा वापर केल्याने आपला चॉपिंग बोर्ड हा एकाच ठिकाणी व्यवस्थित स्थिर बसतो.
कुकरची शिटी स्वच्छ कशी करायची ? काचेच्या बाटलीवरचे स्टिकर कसे काढायचे ? घ्या एकदम सोपे झटपट उपाय...
२. टिश्यू पेपर ऐवजी आपण कॉटनच्या कापडाचा देखील वापर करु शकतो. एखादे जुने रोजच्या वापरातील खरखरीत कापड घेऊन त्याची व्यवस्थित जाड घडी घालून ते ओट्यावर अंथरून घ्यावे. त्यानंतर त्यावर थोडेसे पाणी शिंपडून ते कापड हलकेच भिजवून घ्यावे. आता या ओल्या कापडावर चॉपिंग बोर्ड ठेवून आपण फळं, भाज्या कापू शकता. यामुळे आपला चॉपिंग बोर्ड हा एकाच जागी स्थिर राहून जागचा हलणार नाही.
किसणीला धार नाही, हात दुखून येतात ? १ सोपी ट्रिक, किसणी होईल नव्यासारखी धारदार...
रोजच्या वापरातला चपातीचा तवा झाला खराब ? १ सोपी ट्रिक, तवा होईल पुन्हा नव्यासारखा चकाचक...
३. यासोबतच आपण बाजारांत मिळणाऱ्या नॉन स्लिप मॅट्सचा देखील वापर करु शकता. चॉपिंग बोर्ड सरकू नये एका जागी स्थिर राहावा यासाठी आपण बाजारांत मिळणाऱ्या नॉन स्लिप मॅट्सचा वापर करु शकता.
४. नॉन - स्लिप ग्रिपचा वापर करून चॉपिंग बोर्ड आपण एकाच ठिकाणी स्थिर ठेवू शकता. आपल्या जवळच्या हार्डवेअर स्टोअरमध्ये नॉन - स्लिप ग्रिप असणारी काळ्या रंगाच्या लहान स्टॉपर्सचा वापर करु शकतो. या स्टॉपर्सच्या एका बाजूला चिकट गोंद लावलेला असतो. हे आपण सहजपणे चॉपिंग बोर्डच्या खालच्या चारही बाजुंना चिकटवू शकतो. यामुळे चॉपिंग बोर्डला ग्रीप मिळून तो एकाच जागी स्थिर राहतो.