साधारण पंधरा- वीस वर्षांपुर्वीची शाळा आणि आताची शाळा यात खूप फरक पडला आहे. शिकविण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. आजकाल पालक आणि मुले शाळांमध्ये (school) होणाऱ्या 'ॲक्टीव्हिटीज' (activities) या प्रकाराला सराईत झालेले असतात. पण काही वर्षांपुर्वी मात्र असे काही शाळांमध्ये व्हायचे नाही. आता प्रत्येक शाळेत महिन्यातून एकदा तरी एखादी 'ॲक्टीव्हिटी' होतच असते. यात वर्गातील सगळ्या मुलांना (students) सहभागी करून घेतले जाते. यापैकी काही उपक्रम खरोखरच कौतूकास्पद असतात आणि त्यांचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नक्कीच फायदा होतो.
मुंबईच्या एका शाळेत राबविण्यात आलेला उपक्रम असाच उल्लेखनिय असून सध्या तो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नवरात्री स्पेशल व्यायाम: करा फक्त हे ‘एक’ आसन, पोटावरची चरबी होईल कमी-दिसाल एकदम फिट
rjf.nagriksattamumbai या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात इयत्ता दुसरीची काही मुले दिसत असून या मुलांना शाळेत भेळ बनविण्याचा उपक्रम देण्यात आला आहे. टीमवर्क कसे असते किंवा कसे असावे, हे मुलांना शिकविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता.
या उपक्रमात सगळी मुले अतिशय उत्साहाने सहभागी झाली असून आपण काहीतरी वेगळं करत आहोत, याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. यामध्ये मुलांसमोर एक मोठं भांडं ठेवण्यात आलं होतं.
मुंबईच्या लोकलमध्ये रंगला गरबा, पाहा व्हायरल व्हिडिओ- जगण्याचा उत्साह असावा तर असा..
प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या घरून एकेक पदार्थ आणायला सांगितला होता. शाळेत आल्यावर एकेक विद्यार्थी- विद्यार्थिनी पुढे झाले आणि त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार ते पदार्थ मोठ्या कटोऱ्यात एकत्र केले आणि चटकदार भेळ तयार केली. मुलांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे.