भारतीयांमध्ये प्रतिभेची काहीच कमी नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर आजी-आजोबांपर्यंत अनेक जण आपल्यातील कला सादर करताना दिसतात. सोशल मीडियामुळे तर अशाप्रकारे आपल्या कलेचे सादरीकरण करणे अगदीच सोपे झाले आहे. अगदी काही सेकंदांच्या व्हिडिओमुळे आता जगाच्या कानाकोपऱ्यातील एखाद्या व्यक्तीची कला जगभरात पोहोचू शकते. नुकताच एका शालेय मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ही लहानगी काही सेकंदांमध्ये कित्येक जिल्ह्यांची नावं अगदी तोंडपाठ म्हणून दाखवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला या लहानगीचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नाही तर आपल्याला लहान मुले असतील तर त्यांना हा व्हिडिओ आवर्जून दाखवण्यासारखा आहे (Viral Video of class 4 student from Uttar Pradesh tell 75 Districts name in 31 seconds).
लाल रंगाच्या स्कूल युनिफॉर्ममध्ये पाठीवर सॅक घेतलेली ही मुलगी व्हिडिओच्या सुरुवातीला आपले नाव, शाळेचे नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव सांगते. त्यानंतर अवघ्या ३१ सेकंदांमध्ये ती ७५ जिल्ह्यांची नावे सांगते. हे सांगण्याचा तिचा स्पीड इतका जास्त आहे की काही नावं तर आपल्याला लक्षातही येत नाहीत. या मुलीचे नाव अंकिता असून उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे एका सरकारी शाळेत शिकणारी ही मुलगी असल्याचे समजते. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स तिचे कौतुक तर करत आहेतच पण स्मरणशक्ती इतकी चांगली असल्याबद्दल त्यांना आश्चर्यही वाटत आहे. विशेष म्हणजे श्वास न घेता एका दमात ही लहानगी जिल्ह्यांची नावं सांगत असल्याने तिचा श्वासावर किती कंट्रोल असेल हेही पाहायला मिळते.
UP: Class IV student in Deoria narrates the names of 75 districts of #UP in 31 seconds, the #video went #viral. #UttarPradesh#ViralVideo#SocialMedia#indiapic.twitter.com/qNrlwfL8PY
— Siraj Noorani (@sirajnoorani) September 13, 2022
ट्विटरवर सिरज नुरानी (Siraj Noorani) या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एका दिवसांत ४ हजारहून अधिक जणांनी पाहिला असून अनेकांनी तो रिट्विट केला आहे तर काहींनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एक जण म्हणतो, ग्रेट, खूप पुढे जाशील, तर दुसरा म्हणतो, हे अतिशय अविश्वसनीय आणि आद्भूत असे कौशल्य आहे. केवळ पुस्तकी अभ्यास करुन यश मिळतेच असं नाही असेही आणखी एक जण म्हणतो. या लहानगीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून तिच्यातील या आगळ्यावेगळ्या कौशल्याचे कौतुक होताना दिसते.