उन्हाळ्यात फ्रिजचा वापर जास्त होतो. फ्रिजमध्ये अन्न अधिक काळ टिकते, लवकर खराब होत नाही (Cleaning Tips). अन्नपदार्थांपासून ते मासाल्यांपर्यंत बरेच गोष्टी फ्रिजमध्ये फ्रेश टिकते (Social Viral). पण सतत फ्रिजचा वापर केल्याने ते लवकर खराब होते. त्यामुळे फ्रिज साफ करणं गरजेचं आहे (Kitchen Hacks). मुख्य म्हणजे फ्रिजची सफाई करताना आपण अनेकदा रबर साफ करण्यास विसरून जातो.
फ्रिजचा रबर व्यवस्थित साफ नाही केल्यास, त्यात झुरळं जाऊन बसतात. ज्यामुळे फ्रिजचा डोअर व्यवस्थित बंद होत नाही. ज्यामुळे कुलिंग कमी होते, आणि कालांतराने फ्रिज खराब होऊ शकते. जर आपल्याला फ्रिजचा रबर स्वच्छ करणं किचकट काम वाटत असेल तर, साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा सोपा उपाय करून पाहा. काही मिनिटात फ्रिजचा रबर क्लिन होईल(Clean the Refrigerator Gaskets in 3 Easy Steps).
फ्रिजचा डोअर रबर स्वच्छ करण्यासाठी टिप्स
लागणारं साहित्य
लिक्विड डिशवॉश
बेकिंग सोडा
उर्फी जावेदसारखा चमचमता ग्लो हवा चेहऱ्यावर? तांदुळाच्या पाण्यात मिसळा 'ही' माती चमचाभर; बघा जादू
व्हिनेगर
अशा पद्धतीने क्लिन करा फ्रिजचा डोअर रबर
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप पाणी घ्या. त्यात एक चमचा लिक्विड डिशवॉश मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा व्हिनेगर घालून मिक्स करा. तयार पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.
आता फ्रिजच्या डोअर रबरवर तयार मिश्रण स्प्रे करा. ५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. ब्रशने स्वच्छ न करता आपण, सुती कापडाने देखील फ्रिजचा डोअर रबर क्लिन करू शकता. या ट्रिकमुळे काही मिनिटात फ्रिजचा डोअर रबर स्वच्छ होईल.
कोमट पाणी
जेवणाचं ताट वाढलं की तुम्ही आधी काय खाता? पाहा रोजच्या जेवणात पदार्थांचा योग्य क्रम
आपण कोमट पाण्याने देखील फ्रिजच्या डोअर रबरवर साचलेली घाण स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात सुती कापड भिजवून घ्या, व कापडाने रबर स्वच्छ करा, या ट्रिकमुळे नक्कीच रबर स्वच्छ होईल.
टूथपेस्ट
टूथपेस्ट फक्त दात चमकवण्यासाठी नसून, फ्रिजच्या डोअर रबरवर साचलेली घाण स्वच्छ करण्यासही मदत करू शकते. यासाठी टूथब्रशवर टूथपेस्ट घ्या. नंतर टूथब्रशने रबर घासा. रबर स्वच्छ घासल्यानंतर ५ मिनिटांसाठी तसेच राहूद्या. ५ मिनिटानंतर सुती कापडाने डोअर रबर स्वच्छ पुसून काढा.