Join us

कोटिंग खराब न होऊ देता बघा कसं स्वच्छ करायचं सॅण्डविच मेक रआणि ग्रिलर- काही सेकंदातच चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2024 14:22 IST

How to Clean Griller or Sandwich Maker?: सॅण्डविच मेकर किंवा ग्रिलर स्वच्छ करण्याची ही एकदम सोपी ट्रिक एकदा पाहून घ्या..

ठळक मुद्देसॅण्डविच मेकर किंवा ग्रिलर कसं स्वच्छ करायचं, याची अतिशय सोपी पद्धत...

सॅण्डविच मेकर किंवा ग्रिलर आपण घरात नेहमीच वापरतो. सॅण्डविच किंवा इतर कोणते पदार्थ त्यात ग्रील करताना पदार्थ त्यावर सांडतात. ते खराब होतं. बऱ्याचदा ते गरम असताना पदार्थ त्यावर सांडले तर त्यावर डाग पडतात. आणि मग असं डाग पडलेलं, खराब झालेलं सॅण्डविच मेकर किंवा ग्रिलर स्वच्छ करणं कठीण जातं. कारण आपण ते जास्त जोरात घासून स्वच्छ केलं तर त्यावर असणारं कोटिंग खराब होऊ शकतं. म्हणूनच आता ग्रिलर स्वच्छ, चकाचक करण्याची योग्य पद्धत काेणती ते पाहूया... (How to clean griller or sandwich maker?)

सॅण्डविच मेकर स्वच्छ करण्याची पद्धत

 

सॅण्डविच मेकर किंवा ग्रिलर कसं स्वच्छ करायचं, याची अतिशय सोपी पद्धत broom.broom.boom.official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळेल घरीच, फेशियलवर भरमसाठ पैसे खर्च करण्यापेक्षा हा उपाय करा...

यासाठी आपल्याला एक टिश्यू पेपर आणि पाणी एवढ्या दोन साहित्याचीच गरज आहे.

सगळ्यात आधी तर ग्रिलरवर टिश्यू पेपर टाका. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडा आणि १० ते २० सेकंदासाठी ते सुरू करा. यानंतर ते बंद करून त्यावरचा टिश्यू पेपर अलगदपणे काढून टाका.

ग्रिलर पुर्णपणे स्वच्छ झालेलं असेल.

 

सॅण्डविच मेकरचा वास येत असेल तर....

बऱ्याचदा असं होतं की आपण सॅण्डविच मेकर किंवा ग्रिलर स्वच्छ पुसून घेतो. त्यात अडकलेले खरकटे अन्नपदार्थ तर निघून जातात. पण त्याचा कुबट वास येतो. त्यामुळे मग ते स्वच्छ करूनही अस्वच्छ वाटतं. म्हणूनच अशावेळी सॅण्डविच मेकरचा येणारा वास घालविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लिंबू आणि बेकिंग सोडा लागणार आहे.

'घरचोला' साडी नेसून मैत्रिणीच्या लग्नाला गेली साेनम कपूर, बघा या गुजराथी साडीचं वैशिष्ट्य काय....

एका वाटीत पाणी घ्या. त्यात थोडा बेकिंग सोडा आणि लिंबाचा थोडा रस घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि हे मिश्रण ग्रिलरवर शिंपडा. २ ते ३ मिनिटांनी या मिश्रणाने ग्रिलर पुसून घ्या. त्याला येणारा खरकटा, कुबट वास निघून जाईल. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम अप्लायंसकिचन टिप्स