Join us  

लोकरीचे कपडे वर्षानुवर्षे दिसतील नव्यासारखे, फक्त कपडे धुताना लक्षात ठेवा ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 5:08 PM

How To Wash Woolen Clothes: लोकरीचे कपडे धुताना, वाळत टाकताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे कपड्यांवरची चमक कमी होणार तर नाहीच शिवाय कपडे सैलसरही होणार नाहीत.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे हे कपडे नव्यासारखे दिसतील. शिवाय कपड्यांमध्ये सैलसरपणा येऊन त्यांची फिटिंगही खराब होणार नाही.

एवढे दिवस वर माळ्यावर ठेवून दिलेले लोकरीचे कपडे आता थंडी पडताच बाहेर यायला सुरुवात झाली आहे. थंडीचे दिवस वगळता वर्षभराचे ७ ते ८ महिने हे कपडे एखाद्या बॅगमध्ये ठेवून दिलेले असतात. त्यामुळे आता हे कपडे आता पुन्हा जेव्हा आपण वापरात आणतो, त्यापुर्वी ते एकदा धुवून घेतलेले कधीही चांगले. फक्त लोकरीचे कपडे धुताना (How To Wash Woolen Clothes) काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कपड्यांवरची चमक जराशीही कमी होणार नाही. वर्षानुवर्षे हे कपडे नव्यासारखे दिसतील. शिवाय कपड्यांमध्ये सैलसरपणा (4 Tips for washing woolen clothes) येऊन त्यांची फिटिंगही खराब होणार नाही.

 

लोकरीच्या कपड्यांची काळजी१. डिटर्जंट कोणते वापरावेलोकरीचे कपडे अतिशय नाजूक असतात. त्यामुळे आपण इतर कपड्यांना वापरतो, तसे हेवी डिटर्जंट किंवा साबण या कपड्यांना लावू नये. त्यामुळे लोकरीचा पोत खराब होतो. त्यामुळे लोकरीचे कपडे धुण्यासाठी बेबी शाम्पू, बेबी साबण किंवा मग कोणताही माईल्ड शाम्पू वापरावा. अंगाला लावण्याची साबण वापरूनही लोकरीचे कपडे धुता येतात.

लग्नसराईमध्ये भिकबाळी घ्यायची? बघा १० ट्रेण्डी- आकर्षक पर्याय, एक से एक मस्त डिझाईन्स

२. थंड पाणी वापरालोकरीचे कपडे धुण्यासाठी कधीही गरम किंवा कोमट पाणी वापरू नये. बऱ्याचदा चादरी किंवा बेडशीट आपण गरम पाण्यात भिजत टाकतो. तशीच पद्धत लोकरीच्या कपड्यांसाठीही वापरली जाते. पण गरम पाण्यामुळे लोकरीच्या कपड्यांमध्ये सैलसरपणा येतो.

 

३. हातानेच कपडे धुवालोकरीचे कपडे धुण्यासाठी मशिनचा वापर करणे शक्यतो टाका. मशिनमध्ये धुणार असाल तर मशिनचा मोड जेन्टल करायला विसरू नका. लोकरीच्या कपड्यांना कधीही ब्रश लावू नका. हलक्या हाताने घासून हे कपडे धुवा. तसेच हे कपडे कधीही खूप जोर लावून पिळू नये.

हार्दिक पंड्याचं फिटनेस सिक्रेट, घरी तयार केलेली सात्विक, पौष्टिक खिचडी! पहा खास पौष्टिक डाएट..

४. कपडे वाळत टाकतानालोकरीचे कपडे वाळत टाकताना ते दोरीवर टांगू नका किंवा हँगरलाही लटकवू नका. एका सपाट पृष्ठभागावर हे कपडे पसरवून ठेवा आणि सावलीत वाळू द्या.  

टॅग्स :स्वच्छता टिप्सथंडीत त्वचेची काळजी