सकाळी उठल्यानंतर अनेकांना गरमागरम चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्या शिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही असे अनेकजण आहेत. सकाळी चहा पिण्याची सवय असेल आणि चहा मिळाली तर नाही तर अनेकाचं डोकं दुखायला लागतं. चहा गाळण्याची गाळणी वारंवार वापरून बरीच काळी पडते. (Cleaning Hacks ) पाहायला ते खराब दिसतं आणि यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. काळी झालेली गाळणी स्वच्छ करायला खूपच वेळ लागतो. चहाची गाळणी स्वच्छ करण्याचे काही उपाय तुमचं काम सोपं करू शकतात. (Tips to clean black and blocked tea strainer chai ki channi)
प्लास्टीकची गाळणी कशी स्वच्छ करायची?
प्लास्टीकची चहाचा गाळणी साफ करण्यासाठी तुम्ही अंघोळीचा साबण वापरू शकता. चहाच्या गाळणीवर १५ मिनिटांसाठी साबण लावून ठेवा आणि टुथब्रशच्या मदतीनं रगडून रगडून स्वच्छ करा. महिन्यातून एकदा गाळणी स्वच्छ करा त्यामुळे नेहमीच स्वच्छ राहील.
स्टीलची गाळणी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
आता स्टीलच्या गाळणीतील गाळ साफ करण्यासाठी सर्वप्रथम गॅस सुरू करा आणि गाळणी गरम करा. असे केल्याने स्टीलच्या गाळणीवर साचलेली घाण जळून जाते. आता गाळणी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी, जुन्या टूथब्रशला डिश वॉश लावून गाळणी पूर्णपणे स्वच्छ करा. अशी साफ-सफाई केल्याने गाळणी काही मिनिटांत साफ होईल.
उपाय ३
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला बेकींग पावडर आणि व्हिनेगरची आवश्यकता असेल. प्लास्टीक आणि स्टिलच्या दोन्ही गाळण्या तुम्ही स्वच्छ करू शकता. यासाठी सगळ्यात आधी १ स्टील आणि १ काचेचं बाऊल घेऊन त्यात गाळणी ठेवा. २ चमचे बेकींग पावडर आणि १ टिस्पून पाणी, १ टिस्पून व्हिनेगर मिसळून जाडसर पेस्ट बनवा. कोणतेही जुने टुथब्रश गाळणीला लावून ब्रशच्या मदतीनं गाळणी स्वच्छ करा.