Lokmat Sakhi >Social Viral > चॉपिंग बोर्ड साफ करताय?सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया सांगतात २ सोप्या ट्रिक्स, बोर्ड चकाचक

चॉपिंग बोर्ड साफ करताय?सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया सांगतात २ सोप्या ट्रिक्स, बोर्ड चकाचक

How To Clean Chopping Board by MasterChef Pankaj Bhadouria : स्वच्छतेबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 12:59 PM2022-08-10T12:59:18+5:302022-08-10T13:02:31+5:30

How To Clean Chopping Board by MasterChef Pankaj Bhadouria : स्वच्छतेबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या टिप्स...

Cleaning the chopping board? Celebrity chef Pankaj Bhadauria shares 3 simple tricks to keep the board sparkling clean | चॉपिंग बोर्ड साफ करताय?सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया सांगतात २ सोप्या ट्रिक्स, बोर्ड चकाचक

चॉपिंग बोर्ड साफ करताय?सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया सांगतात २ सोप्या ट्रिक्स, बोर्ड चकाचक

Highlightsचिरल्याने आधीच या बोर्डला चरे पडलेले असल्याने ही घाण बोर्डमध्ये अडकून राहते. चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी लिंबू हे एक सुरक्षित क्लिंजिंग म्हणून आपण आवर्जून वापरु शकतो. 

आपण सगळेच कधी भाज्या चिरण्यासाठी तर कधी फळं चिरण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरतो. विळी ही आता काहीशी मागे पडली असून सुरीने स्वयंपाकातील एखादी गोष्ट चिरण्यासाठी चॉपिंग बोर्डचा सर्रास वापर केला जातो. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चॉपिंग बोर्ड मिळतात. यात लाकडी, प्लास्टीकचे, मेटलचे अशा विविध प्रकारांचा समावेश असतो. सुरीने चिरणे सोपे जाते तसंच वेळही वाचतो, त्यामुळे चॉपिंग बोर्डला जोडलेली सुरी, थोड्या वेगळ्या आकाराचे, प्रकारचे बोर्ड घरोघरी वापरले जातात. (Tips by MasterChef Pankaj Bhadouria) आता सोयीस्कर असलेला चॉपिंग बोर्ड वापरण ठिक आहे पण वापरल्यानंतर तो साफही करावा लागतो. आपण ज्याप्रमाणे स्वयंपाकात वापरलेली भांडी स्वच्छ घासतो आणि मगच ती पुन्हा वापरतो, त्याचप्रमाणे चॉपिंग बोर्डही वेळच्या वेळी योग्य पद्धतीने साफ करायला हवा (How To Clean Chopping Board).  

(Image : Google)
(Image : Google)

चॉपिंग बोर्ड वेळच्या वेळी नीट साफ केला नाही तर त्यावर जमा होणारे किटाणू अन्नाच्या मार्फत आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते, आरोग्यासाठी ते चांगले नसते. तसेच स्वच्छता म्हणूनही चॉपिंग बोर्ड खराब असणे योग्य नाही. म्हणूनच हा बोर्ड साफ करण्याची योग्य पद्धत आपल्याला माहित असायला हवी. यासाठीच प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया चॉपिंग बोर्ड साफ करण्याच्या सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स देतात. पाहूयात वेगवेगळे चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी त्या काय सांगतात...

१. लाकडी चॉपिंग बोर्ड

लाकडी चॉपिंग बोर्ड किचनमध्ये अनेकदा ओला होतो. त्यामुळे त्यावर काळपट असे डाग पडतात. हा बोर्ड लवकर वाळत नाही आणि काही वेळाने तसाच बोर्ड पुन्हा वापरल्याने तो फार कमी वेळा कोरडा राहतो. त्यामुळे त्यावर चढणारे किटण आपल्या आरोग्य़ासाठी अजिबबात चांगले नसते.  हा लाकडी चॉपिंग बोर्ड बेकींग सोडा आणि लिंबाच्या मदतीने आपण तो साफ करु शकतो. बेकींग सोड्यामुळे बोर्ड केवळ साफच होणार नाही तर त्यावरील सर्व किटाणू मारण्यास त्याचा चांगला उपयोग होईल. लिंबू हाही एक नैसर्गिक किटाणूनाशक आहे, त्यामुळे चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी लिंबू हे एक सुरक्षित क्लिंजिंग म्हणून आपण आवर्जून वापरु शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

साफ करण्याची पद्धत 

१. बोर्डवर सगळीकडे बेकींग सोडा घाला. 
२. लिंबू अर्धे कापून त्या फोडीने हा सोडा बोर्डवर सगळीकडे पसरवा. 
३. सोडा आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण लाकडी चॉपिंग बोर्डमध्ये अडकलेली घाण बाहेर काढण्यास मदत करेल. 
४. साधारणपणे २० मिनीटासाठी हा बोर्ड असाच बाजूला ठेवून द्या.
५. त्यानंतर पाण्याने बोर्ड स्वच्छ धुवा आणि कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्या.
६. अर्धा चमचा तेल घालून ते या लाकडी बोर्डवर हाताने सगळीकडे एकसारखे लावा.
७. कापडाने हा बोर्ड पुन्हा पुसून घ्या म्हणून तेल सगळीकडे नीट लागेल आणि बोर्ड खूप तेलकटही राहणार नाही. 


२. प्लास्टीक चॉपिंग बोर्ड 

प्लास्टीक चॉपिंग बोर्ड साधारणपणे पांढऱ्या रंगाचा असतो. सततच्या वापराने या बोर्डवर काळे डाग पडतात. चिरल्याने आधीच या बोर्डला चरे पडलेले असल्याने ही घाण बोर्डमध्ये अडकून राहते. कित्येकदा पाण्याने किंवा साबणाने धुवूनही ही घाण बाहेर निघत नाही. अशावेळी बोर्ड साफ करण्यासाठी बोकींग सोडा, व्हिनेगर आणि मीठ यांचा उपयोग केल्यास बोर्ड लवकर आणि चांगला साफ होतो. 

साफ करण्याची पद्धत

१. या बोर्डवर बेकींग सोडा आणि मीठ घालून १० मिनीटे तसेच ठेवा. 
२. मग स्पंजने हा बोर्ड चांगला पुसून घ्या.
३. लिंबाच्या साली बोर्डवर चांगल्या घासा. 
४. त्यानंतर पाण्यात व्हाईट व्हिनेगर घालून ते बोर्डवर लावून काहीवेळ बोर्ड तसाच ठेवा. 
५. नंतर हा बोर्ड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. बोर्ड एकदम चकाचक साफ झालेला दिसेल. 
 

Web Title: Cleaning the chopping board? Celebrity chef Pankaj Bhadauria shares 3 simple tricks to keep the board sparkling clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.