आपल्याकडे चहा प्रेमींची काहीच कमी नाही. त्यामुळे चहा हा पदार्थ काही अपवाद सोडता बहुतांश घरांमध्ये रोजच्या रोज होतोच. अगदी प्रत्येक दिवसाची सुरुवातच चहाने होते. शिवाय काही काही घरांमध्ये तर दिवसांतून ३- ४- ५ वेळाही चहा होतो. आता प्रत्येकवेळी चहा गाळून झाल्यानंतर गाळणीत आणि भांड्यात चहा पावडर असतेच. ही पावडर आपण सरळ कचऱ्यात टाकून देतो (use of used tea powder for cleaning utensils). पण आपण समजतो, तेवढी ती टाकाऊ नाही. स्वयंपाक घरातली काही जळकट भांडी स्वच्छ करण्यासाठी तिचा मस्त वापर करता येतो. (Cleaning Tips)...
चहा गाळल्यानंतर उरलेल्या पावडरचा उपयोग१. हा उपाय इन्स्टाग्रामच्या shardakitchen या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
२. हा उपाय करण्यासाठी एका कढईमध्ये १ ग्लास पाणी टाका. त्यात चहा गाळल्यानंतर उरलेली चहा पावडर टाका. त्यात लिंबाचा रस काढून उरलेली लिंबाची ८- १० साले आणि २ टेबलस्पून मीठ टाका.
कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट
३. हे मिश्रण १० ते १२ मिनिटे मध्यम आचेवर उकळून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झालं की लिंबाची सालं कुस्करून घ्या. आता या पाण्यात इनो टाका आणि हे मिश्रण एखाद्या बाटलीमध्ये भरून ठेवा.
४. एखाद्या डिशवॉशप्रमाणे हे मिश्रण वापरता येते आणि त्याचा उपयोग करून स्वयंपाक घरातली अनेक भांडी चकाचक करता येतात.
या पाण्याचा उपयोग कशासाठी करायचा?१. उरलेल्या चहा पावडरपासून आपण जे होममेड डिश वॉश तयार केलं आहे, ते गरम असताना त्यात काळे पडलेले गॅस बर्नर १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर ब्रशने घासून घ्या. एकदम स्वच्छ होतील.
मेहंदी लावून लालसर झालेले केस आवडत नाही? मेहंदीमध्ये ४ गोष्टी टाका, केस होतील काळेभोर- सिल्की
२. ॲल्यूमिनियमच्या भांड्यावर पडलेले डाग, काळपट पडलेली कढई, जळालेली स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठीही या पाण्याचा उत्तम उपयोग होतो.