चपाती हा आपल्या रोजच्या जेवणातला मुख्य पदार्थ आहे. चपाती शिवाय आपले जेवण अधुरेच आहे. प्रत्येक घरांत चपात्या या बनवल्या जातात. भारतीय जेवणात वरण भात, भाजी पोळी या पदार्थांचा नेहमीच समावेश असतो. याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे घरच्या गृहिणीला चपात्या या बनवाव्याच लागतात. काहीजणांच्या घरातील किचनमधील विशिष्ट भांडी ही त्या त्या पदार्थांसाठीच वापरली जावी असा नियम असतो. याचबरोबर काही गृहिणींचे ठरलेले असते की अमुक भाजी साठी हाच एक पॅन किंवा पुलाव करण्यासाठी हेच ठरलेलं भांड वापरायचे. त्याचप्रमाणे चपाती लाटण्यासाठीचा तवा, पोळपाट लाटण हे देखील नेहमीप्रमाणे आपलं ठरलेलच असत(How To Clean Roti Tawa In 2 Minutes).
चपाती बनवायची म्हटलं की त्यासाठी लागणारा तवा हा आपण अगदी निरखून खरेदी करतो. चपाती भाजताना ती तव्यावर चिकटू नये, चपाती सर्व बाजुंनी व्यवस्थित भाजून निघेल किंवा करपणार नाही अशा लहान लहान गोष्टींचा विचार आपण करतो. चपाती भाजण्यासाठीचा तवा किंवा पॅन हा आपण वेगळाच ठेवतो. शक्यतो दुसरा कोणताही पदार्थ बनवताना आपण त्याचा सहसा वापर करत नाही. असे असले तरीही काहीवेळा रोजच्या त्याच तव्यावर चपात्या शेकून तो खराब (Kitchen Hacks: Simple Ways To Clean Roti Pan & Tawa, Keep Utensils Sparkling New By Following These Steps) होऊ लागतो. या तव्यावर तेलाचे डाग पडतात किंवा काहीवेळा चपाती चिकटल्याचे चिकट डाग राहतात. असे हट्टी डाग या तव्यावरुन निघता निघत नाहीत. असा तवा रोज घासून देखील स्वच्छ (Easy Way To Clean Tawa In 2 minutes) होत नाही. या वापरुन खराब झालेल्या तव्यावर चपात्या केल्याने काहीवेळा त्यांचा रंग बदलतो, त्या तव्याला चिकटतात, करपतात किंवा व्यवस्थित होत नाही. अशा परिस्थितीत, काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून आपण हा तवा स्वच्छ करु शकतो(How To Clean Tawa : Cleaning Oil Layer formed Roti Tawa).
दररोज चपाती करुन खराब झालेला तवा कसा स्वच्छ करावा ?
१. सगळ्यांत आधी गॅसच्या मंद आचेवर हा तवा ठेवून तो तापवून घ्यावा.
२. तवा व्यवस्थित गरम झाल्यावर त्यावर २ ते ३ टेबलस्पून व्हिनेगर घालावे.
३. व्हिनेगर चमच्याने संपूर्ण तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्यावे.
लोखंडी भांडी वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर कशी स्वच्छ ठेवावी ? ८ टिप्स, भांडी वापरा बिनधास्त...
४. आता एका सुरीच्या टोकाला अर्धे लिंबू कापून ते लावावे. हे अर्धे लिंबू व्हिनेगर घातलेल्या गरम तव्यावरून फिरवून घ्यावे.
५. त्यानंतर ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्यावे, तवा थोडा थंड करुन घ्यावा.
६. तवा थंड झाल्यावर नेहमीप्रमाणे साबणाने किंवा लिक्विड सोपं वापरुन स्वच्छ धुवून घ्यावा.
डबे - बरण्यांचा लोणची - मसाल्यांचा वास जात नाही ? १ सोपी ट्रिक - वास जाईल पटकन...
रोज रोज वापरून खराब झालेला चपातीचा तवा पुन्हा नव्यासारखा दिसेल व वापरण्यायोग्य होईल. यामुळे तव्यावरील चिकट, तेलकट डाग कायमचे निघून जाण्यास मदत मिळते.