आपण आपलं घर तर स्वच्छ, टापटीप राहावं यासाठी प्रयत्न करतच असतो. अगदी दसरा- दिवाळी या निमित्ताने सगळ्या घराची अगदी झाडून- पुसून स्वच्छता होत असते. पण स्वयंपाक घर हे आपल्या घरातलं असं एक ठिकाण आहे जे अगदी रोजच्या रोज स्वच्छ व्हायलाच हवं. कारण सगळ्या घराचं आरोग्य स्वयंपाक घरातूनच जपलं जातं. आणि नेमकं तिथेच आपल्याकडून काहीतरी कमतरता राहून जाते. त्यामुळे मग कितीही स्वच्छ ठेवलं तरी स्वयंपाक घरात मुंग्यांचा आणि झुरळांचा अक्षरश: सुळसुळाट असतो (main reason for ants and cockroaches in kitchen). त्याची नेमकी कारणं काय आहेत (how to clean kitchen easily?) आणि स्वयंपाक घरातले कोणते भाग आपल्याकडून स्वच्छ करायचे राहतात, ते एकदा पाहून घ्या..(cleaning tips for kitchen)
स्वयंपाक घरातल्या ५ गोष्टींची स्वच्छता करायला तुम्हीही विसरता का?
१. गॅस शेगडी तर आपण नियमितपणे स्वच्छ करतो. पण अनेक जणी शेगडीचा मागचा भाग आणि शेगडीच्या बटणांच्या आजुबाजुचा भाग स्वच्छ करायला विसरतात. त्यामुळे मग बटणांच्या भोवती आणि शेगडीच्या मागच्या बाजुला चिकट थर साचतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा बटणं काढून तसेच मागच्या बाजुने घासून शेगडी स्वच्छ करा.
केस खूप कोरडे झाले? फक्त ५ भेंड्यांचा करा १ उपाय, खराट्यासारखे केसही होतील सिल्की-सुळसुळीत
२. शेगडीच्या मागच्या बाजुच्या टाईल्स आणि ओटा आपण स्वच्छ करतो. पण ओटा आणि ओट्याच्या मागच्या टाईल्स यांच्यामध्ये जी भेग असते, त्यामध्ये स्वच्छ करणं राहून जातं. त्यात बऱ्याचदा खरकटं अडकून राहतं आणि त्याला मुंग्या, झुरळं होतात.
३. सिंक आपण दररोजच स्वच्छ करतो. पण सिंकच्या पाईपची आतून स्वच्छता होणंही गरजेचं असतं. कारण त्या पाईपमध्ये बरेच अन्नपदार्थ चिटकून राहतात. ते कुजतात आणि मग त्याची दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे आठवड्यातून एकदा बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि कडक पाणी सिंकमध्ये टाकलं पाहिजे. पाईप आतून स्वच्छ होईल.
४. किचन ट्रॉली महिन्यातून एकदा स्वच्छ केली तरी चालेल. पण ट्रॉलींचे आणि किचनमधल्या इतर कॅबिनेट्सचे हॅण्डल मात्र आठवड्यातून एकदा न विसरता स्वच्छ करा. कारण त्याला बऱ्याचदा खरकटे हात लागलेले असतात.