किचनमधील अतिरिक्त धूर बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाच्याच घरी एग्जॉस्ट फॅन असतो. यामळे धूर आणि दुर्गंध दूर होण्यास मदत होते. ( How to Clean Greasy Kitchen Exhaust Fan) कित्येक दिवस एग्जोस्ट फॅन स्वच्छ न केल्यामुळे तेलाचे डाग पडतात आणि चिकटपणा येतो. एग्जॉस्ट फॅन उंचावर बसवला जात असल्यामुळे सहज स्वच्छ करणं शक्य नसतं आणि रोजचं काम करून थकवा आल्यानंतर लोकही एग्जॉस्ट फॅन स्वच्छ करण्यास कंटाळा करतात. (Cleaning Tips & Hacks)
पंखा वेळच्यावेळी साफ न केल्यास धूळ, मातीच्या संपर्कात येऊन पंख्यावर घाणीचे जाड थर येतात. अशा स्थितीत एग्जोस्ट (Exhaust Fan) फॅन खराब होऊ शकतो आणि कार्यक्षमता कमी होते. धूर आणि दुर्गंध बाहेर फेकला जात नाही. एग्जोस्ट फॅन साफ करण्याचे काही सोपे उपाय तुम्हाला मदत करतील. (Cleaning Hacks)
एग्जॉस्ट फॅनवर (Exhaust Fan) एक जाळी लावलेली असते. ज्याला मेश फिल्टर असं म्हणतात. ही जाळी तेलामुळे ब्लॉक होते. ही साफ करण्यासाठी तुम्ही गरम पाणी किंवा अमोनियाचा वापर करू शकता. गरम पाण्यात अर्धा कप अमोनिया मिसळून एक पेस्ट तयार करा आणि त्यात मेश फिल्टर बुडवा.
चेहरा थकल्यासारखा, काळपट दिसतोय? रात्री १ गोष्ट चेहऱ्याला लावा, सकाळी ग्लोईंग दिसेल चेहरा
जवळपास १ तासासाठी भिजवून ठेवा. त्यानंतर त्यावर लागलेली घाण आणि चिकटपणा कमी होईल आणि एग्जॉस्ट फॅन वेगानं फिरेल. या द्रावणात जाळी किमान 1 तास भिजवा. जेणेकरून त्यावरील घाण आणि ग्रीस सहज निघेल. द्रावणातून जाळी काढल्यानंतर हलक्या हातांनी घासून घ्या जेणेकरून सर्व घाण जाळीतून निघेल आणि एक्जोस्ट फॅन व्यवस्थित काम करेल.
सोडीयम फॉस्फेट क्लिनर
बाजारात मिळणाऱ्या सोडियम फॉस्फेट क्लिनरचा वापर करून तुम्ही पंखा स्वच्छ करू शकता. या सोल्यूशनचा वापर करताना हात आणि तोंड कव्हर करणं गरजेचं आहे. हा उपाय करताना तुम्ही मास्कचाही वापर करू शकता.
गरम पाण्याचं मिश्रण
एग्जॉस्ट फॅन(Exhaust Fan) पाण्याच्या मिश्रणानं स्वच्छ केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला गरम पाण्यात अर्धा कप अमोनिया आणि २ चमचे बेकिंग सोडा मिसळून एक सोल्यूशन तयार करावं लागेल. नंतर एक कापड या मिश्रणात मिसळून ओला करून पंखा साफ करा.जेणेकरून तुमचा जास्त वेळ जाणार नाही.
कॉस्टिक सोल्यूशन
एग्जॉस्ट फॅनमध्ये (Exhaust Fan) लागलेला चिकटपणा हटवण्यासाठी कॉस्टिक केमिकल्सचा वापर तुम्ही करू शकता. हे तुम्हाला बाजारात अगदी सहज उपलब्ध होईल. हे सोल्यूशन गरम पाण्यात मिसळून पंख्याच्या ब्लेड्सवर स्प्रे करा. यानंतर एका कापडाच्या मदतीनं पंखा स्वच्छ करा.
स्टिम क्लिनिंग
लहान स्टिम क्लिनरचा वापर करून तुम्ही एग्जॉस्ट फॅन स्वच्छ करू शकता. घाणेरड्या भागावर गरम पाण्याचा स्प्रे करून स्वच्छ टॉवेलच्या मदतीनं पंखा स्वच्छ करा. व्हिनेगर, डिश वॉश लिक्विडच्या मदतीनंही तुम्ही एग्जॉस्ट फॅन आणि त्याची जाळी स्वच्छ करू शकता.