Lokmat Sakhi >Social Viral > फोमच्या खुर्च्यांवरची धूळ काढून त्या स्वच्छ करण्याची नवीकोरी ट्रिक, खुर्च्या दिसतील पुन्हा नव्यासारख्या...

फोमच्या खुर्च्यांवरची धूळ काढून त्या स्वच्छ करण्याची नवीकोरी ट्रिक, खुर्च्या दिसतील पुन्हा नव्यासारख्या...

Cleaning Tips : How To Clean A Fabric Chair : रोज वापरुन खुर्चीवरील फॅब्रिक मळके होते अशावेळी खुर्ची कशी स्वच्छ करावी असा प्रश्न पडतो, त्याचीच एक सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 12:49 PM2024-07-03T12:49:51+5:302024-07-03T13:05:45+5:30

Cleaning Tips : How To Clean A Fabric Chair : रोज वापरुन खुर्चीवरील फॅब्रिक मळके होते अशावेळी खुर्ची कशी स्वच्छ करावी असा प्रश्न पडतो, त्याचीच एक सोपी ट्रिक...

Cleaning Tips How To Clean A Fabric Chair How To Clean Fabric Chairs How To Clean Fabric Chairs At Home | फोमच्या खुर्च्यांवरची धूळ काढून त्या स्वच्छ करण्याची नवीकोरी ट्रिक, खुर्च्या दिसतील पुन्हा नव्यासारख्या...

फोमच्या खुर्च्यांवरची धूळ काढून त्या स्वच्छ करण्याची नवीकोरी ट्रिक, खुर्च्या दिसतील पुन्हा नव्यासारख्या...

टेबल - खुर्च्या या प्रत्येकाच्या घरात असतात रोजच्या वापरातल्या वस्तूंपैकी या महत्वाच्या वस्तू आहेत. आपण घराला शोभतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या घेतो. आपल्या घरात किमान ३ ते ४ प्रकारच्या खुर्च्या असतात. खुर्च्यांमध्ये देखील प्लॅस्टिकच्या, लाकडी, फोमच्या अशा वेगवेगळ्या पद्धतींच्या खुर्च्या असतात. त्यातही जर फोमच्या खुर्च्या (How to Clean Fabric Dining Chairs) असल्या तर त्यांची स्वच्छता ठेवणे मोठे कठीण काम असते. घरातील या खुर्च्यांचा (Tips to Quickly and Easily Clean Fabric Dining Chairs ) रोज वापर होत असल्याकारणाने त्या लवकर मळून खराब दिसू लागतात. त्यातही जर खुर्च्या प्लॅस्टिकच्या असतील तर त्या लगेच पाण्याखाली धरुन स्वच्छ धुता येतात. परंतु फोमच्या किंवा कापसाची गादी अ‍ॅटॅच असणाऱ्या खुर्च्या साफ करणे फारसे शक्य होत नाही(How to clean a fabric chair at home).

फोमच्या खुर्च्यांची धूळ आपण फार फार तर झटकून काढू शकतो. परंतु काहीवेळा या खुर्च्यांमध्ये असणारा फोम आणि त्यावरील फॅब्रिक इतके मळके होते की ती खुर्ची खराब दिसू लागते. रोज वापरुन खुर्चीवरील फॅब्रिक मळके होते अशावेळी ती खुर्ची कशी स्वच्छ करावी असा आपल्याला प्रश्न पडतो. त्यामुळे घरातील फोमच्या खुर्च्या स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक पाहूयात(How To Clean Fabric Chairs At Home).

फोमच्या खुर्च्या स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक... 

साहित्य :- 

१. बेकिंग सोडा 
२. ब्रश
३. गरम पाणी
४. लिक्विड सोप
५. इसेंन्शियल ऑईल 
६. कॉटनचे नॅपकिन 

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅक मधील घाण साफ करणे आता झाले सोपे, वापरा या २ ट्रिक्स... 

कृती :- 

१. सगळ्यांत आधी खुर्चीवर ज्या भागात फोम लावला आहे. त्या भागावर बेकिंग सोडा भुरभुरवून घ्यावा. त्यानंतर हा बेकिंग सोडा सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यावा. 
२. किमान अर्धा तास हा बेकिंग सोडा त्या फोमवर तसाच ठेवावा. 
३. आता मोठ्या ब्रशच्या मदतीने खुर्चीला अ‍ॅटॅच असणारी गादी किंवा फोम हलक्या हातांनी घासून घ्यावा. 
४. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात लिक्विड सोप व इसेंन्शियल ऑईलचे काही थेंब घालून खुर्ची साफ करण्याचे द्रावण तयार करून घ्यावे. 

घरातील शोभेच्या फुलांवरील धूळ स्वच्छ करण्याची झटपट ट्रिक, पटकन करा हा सोपा उपाय...  

५. आता एक छोटी वाटी घेऊन ती वाटी संपूर्ण कव्हर होईल असा एक कॉटनचा रुमाल त्यावर बांधून घ्यावा. 
६. त्यानंतर वाटीच्या तोंडावर कापड बांधलेला भाग त्या तयार द्रावणात बुडवून मग खुर्चीच्या फॉमवर हा पृष्ठभाग घासावा. 
७. नंतर आणखी एक कॉटनचा रुमाल घेऊन खुर्चीचा उरलेला भाग स्वच्छ पुसून घ्यावा. 
८. आता ही खुर्ची ऊन्हात ठेवून व्यवस्थित संपूर्णपणे वाळू द्यावी. 

अशाप्रकारे आपण घरच्या घरी या सोप्या ट्रिकचा वापर करून घरातील फोमच्या खुर्च्यांची झटपट सफाई करू शकता, यामुळे या खुर्च्या पुन्हा नव्यासारख्या दिसतील.

Web Title: Cleaning Tips How To Clean A Fabric Chair How To Clean Fabric Chairs How To Clean Fabric Chairs At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.