Lokmat Sakhi >Social Viral > पाणी वाहून जात नसल्याने सिंक तुंबलेय? २ घरगुती उपाय, पाण्याचा होईल चटकन निचरा

पाणी वाहून जात नसल्याने सिंक तुंबलेय? २ घरगुती उपाय, पाण्याचा होईल चटकन निचरा

Cleaning Tips For Sink, Basin or Bathroom: बऱ्याचदा आपल्या सिंकमध्ये, बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये पाणी साचून राहतं. अशावेळी हे दोन घरगुती उपाय करून बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 11:50 AM2023-08-18T11:50:16+5:302023-08-18T11:53:30+5:30

Cleaning Tips For Sink, Basin or Bathroom: बऱ्याचदा आपल्या सिंकमध्ये, बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये पाणी साचून राहतं. अशावेळी हे दोन घरगुती उपाय करून बघा...

Cleaning Tips: How to clean blocked sink, basin or bathroom, | पाणी वाहून जात नसल्याने सिंक तुंबलेय? २ घरगुती उपाय, पाण्याचा होईल चटकन निचरा

पाणी वाहून जात नसल्याने सिंक तुंबलेय? २ घरगुती उपाय, पाण्याचा होईल चटकन निचरा

Highlightsअशी अडचण आलीच तर चटकन हे २ उपाय करून बघा

कोणतही घर का असेना ही समस्या कधी ना कधी तरी येतेच. त्यामुळेच तर त्यावरचा घरगुती उपाय आपण माहिती करून घेतलेला कधीही उत्तम... आपण सिंक, बेसिन, बाथरूम कितीही स्वच्छ ठेवलं, त्याच्यात कचरा जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली तरी कधी ना कधीतरी असं होतंच... आपल्या नेहमीच्या कामाच्या गडबडीत असं तुंबलेला सिंक, बेसिन किंवा बाथरूम पाहिलं की फार वैतागायला होतं (blocked sink, basin or bathroom). शिवाय त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. कारण त्यातून लगेचच दुर्गंधी यायला सुरुवात होते. त्यामुळेच अशी अडचण आलीच तर चटकन हे २ उपाय करून बघा (Home remedies)..

 

तुंबलेलं सिंक बेसिन किंवा बाथरूम मोकळं करण्यासाठी बाजारात काही केमिकल्स मिळतात. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ताबडतोब बाजारात जाऊन ते खरेदी करणं शक्य नसतं किंवा दुकानं जवळ नसतात. अशावेळी त्या केमिकल्सवाचून खोळंबा व्हायला नको, म्हणून तुम्ही हे काही तात्पुरते उपाय करून तुमची अडचण तेवढ्यापुरती सोडवू शकता.

ऐन तारुण्यात गुडघे दुखतात? दररोज फक्त १० मिनिटं करा खास व्यायाम, गुडघे ठणकणं होईल कमी

तुंबलेलं सिंक मोकळं करण्यासाठी उपाय
१. कॉफी आणि डिशवॉश लिक्विड

कॉफीच्या मदतीने तुंबलेले सिल्क स्वच्छ करायचं असेल तर आधी सिंकमध्ये १ ते २ टेबलस्पून कॉफी पावडर टाका. त्यानंतर तेवढेच लिक्विड डिशवॉश टाका आणि नंतर साधारण २ ग्लास उकळते पाणी टाका. सिंक स्वच्छ होईल.

 

२. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
हा उपाय करण्यासाठी आधी दीड ते दोन टेबलस्पून बेकिंग सोडा सिंकमध्ये घाला. त्यानंतर त्यात ४ ते ५ टेबलस्पून व्हिनेगर घाला. व्हिनेगर नसल्यास लिंबाचा रसही वापरू शकता.

बाळ हसायला लागलं की आईचे केस गळू लागतात, असं का? तज्ज्ञ सांगतात खरंखुरं कारण आणि उपाय

हे मिश्रण घातल्यानंतर साधारण ५ ते ७ मिनिटांनी सिंकमध्ये उकळतं पाणी घाला. अडकलेली घाण मोकळी होऊन पाण्याचा निचरा होईल. 

 

Web Title: Cleaning Tips: How to clean blocked sink, basin or bathroom,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.