कपडे आपल्या वेळेनुसार कधीही झटपट धुणं होतात, आपल्याला खूप कष्ट पडत नाहीत शिवाय कपडे धुवायला येणाऱ्या बायकांच्या वेळा सांभाळण्याचीही गरज नाही, म्हणून बऱ्याच जणी घरीच वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतात. तसे त्यात इतर कपडे स्वच्छही निघतात. पण शर्टच्या मळक्या कॉलर मात्र त्यात व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. ब्रशने घासल्यानंतर कॉलर जशी स्वच्छ दिसते, तसं काही मशिनमध्ये (How to Clean Collar & Cuff in Washing Machine) शर्ट धुतल्यानंतर होत नाही. म्हणूनच मशिन वॉशमध्ये शर्टच्या कॉलर स्वच्छ निघाव्या, यासाठी हा उपाय करून बघा.
मशिन वॉशमध्ये शर्टची कॉलर स्वच्छ होण्यासाठी उपाय
हा उपाय इन्स्टाग्रामच्या appliancegurukul या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय अतिशय सोपा असून त्यासाठी आपल्याला विशेष कष्ट घेण्याची अजिबातच गरज नाही.
अस्सल पंजाबी चवीची ढाबास्टाईल दाल- मखनी करा घरीच, ही बघा एक चवदार रेसिपी
शिवाय ब्रश घेऊन काॅलर घासण्याचीही आवश्यकता नाही. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी शर्ट थोडा वेळ पाण्यात भिजू द्या. त्यानंतर कॉलर ओलसर झाली की तुमच्या घरातला कोणताही शाम्पू घ्या. बेबी शाम्पू नको. इतर कोणताही हार्ड शाम्पू घ्यावा. २ ते ३ थेंब शाम्पू कॉलरवर टाका. आणि बोटानेच कॉलरच्या मळक्या भागावर पसरवा. त्यानंतर नेहमीसारखं मशिन सुरू करून टाका. कपडे धुवून झाल्यानंतर शर्टची कॉलर नेहमीपेक्षा अधिक स्वच्छ दिसेल.
हा उपायही करून बघा
मशिन वॉशमध्ये शर्टच्या मळक्या कॉलर स्वच्छ करण्यासाठी हा दुसरा उपायही काही जणांनी सुचवला आहे.
व्यायामासाठी वेळच नाही, ५ मिनिटांचे स्ट्रेचिंग करा... बघा फिटनेससाठी तज्ज्ञांनी सांगितलेले ५ व्यायाम
हा उपाय करण्यासाठी मीठ आणि बेकिंग सोडा लागणार नाही. मीठ आणि बेकिंग सोडा समान प्रमाणात घ्या. ज्याप्रमाणे तुम्ही शाम्पू कॉलरवर लावला, त्याचप्रमाणे मीठ आणि बेकिंग सोड्याचं मिश्रणही कॉलरवर घासा. आणि नेहमीप्रमाणे मशिन सुरू करून शर्ट धुवून घ्या.