ढोकळा, इडली, केक असे पदार्थ अधिक मऊसूत व्हावेत आणि मस्त फुगून हलके व्हावे, यासाठी बेकिंग सोड्याचा वापर कसा करायचा, हे आपल्याला माहिती आहेच. पण खाण्यासाठी उपयोगात येणारा हा बेकिंग सोडा घराच्या स्वच्छतेसाठीही अतिशय उपयुक्त ठरतो, हे अनेकांना ठाऊक नसते (How to use baking soda for cleaning?). कित्येकदा तर बाजारात विकत मिळणाऱ्या केमिकलयुक्त पदार्थांपेक्षाही स्वच्छतेच्या बाबतीत बेकिंग सोडा उजवा ठरतो (How to clean house using baking soda). फक्त त्याचा नेमका आणि अचूक उपयोग करता यायला हवा (cleaning tips and hacks).. तेच आता आपण बघुया...
स्वच्छतेसाठी बेकिंग सोड्याचा वापर कसा करायचा?
१. घाण झालेले सिंक
स्वयंपाक घरातले सिंक नेहमीच ओलसर राहते. त्यात बऱ्याचदा खरकटे सांडलेले असते. खरकटेपणा आणि ओलसरपणामुळे सिंक घाण होते. ते व्यवस्थित स्वच्छ झाले नाही, तर त्यावर पिवळसर रंग साचू लागतो.
मग हळूहळू ते स्वच्छ- चकाचक करणे कठीण होते. सिंकवर साचलेला हा पिवळेपणाचा थर काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो. बेकिंग सोडा, डिश वॉश लिक्विड आणि मीठ या ३ गोष्टी सम प्रमाणात घेऊन एकत्र करा आणि त्याने सिंक स्वच्छ करा. चटकन साफ होईल.
२. सिंक तुंबले असेल तर...
बऱ्याचदा कचरा अडकल्यामुळे सिंकमधून व्यवस्थित पाणी जात नाही आणि ते तुंबते. किंवा त्यातून दुर्गंधी येऊ लागते.
कडू कारल्याचं झटपट चविष्ट लोणचं करण्याची सोपी रेसिपी, कडवटपणा गायब- कारलंही लागेल आवडायला
यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड यांचा वापर करता येतो. हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात एकत्र करा आणि ते मिश्रण सिंकमध्ये ओता. काही वेळाने सिंकमध्ये तुंबलेले पाणी जाऊ लागेल.
३. घरातल्या इतर गोष्टींच्या स्वच्छतेसाठी...
नळावर गंज साचला असेल तर, बोअरिंगच्या पाण्यामुळे फरशीवर पिवळेपणा आला असेल तर बेकिंग सोडा, मीठ, व्हिनेगर, डिशवॉश लिक्विड हे तिन्ही सम प्रमाणात घ्या.
हात- पाय खूपच काळपट दिसतात? फक्त १० रुपयांत करा एक खास उपाय- हातापायांवर येईल चमक
त्यात कोमट पाणी टाका. आणि हा स्प्रे वरील ठिकाणी मारा. थोडेसे घासा आणि नंतर धुवून घ्या. स्वच्छ होईल. या स्प्रे चा वापर आरसे, फ्रिज, काचा स्वच्छ करण्यासाठीही होतो.