Join us  

गॅस बर्नरच्या आजुबाजुला काळपट डाग पडले? २ उपाय, डाग होतील स्वच्छ- गॅस चमकेल नव्यासारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2022 6:38 PM

How to Get Rid of Stains on Gas: गॅस बर्नरच्या बाजुला एक स्टीलची प्लेट असते. काही गॅसला ही प्लेट ॲटॅच असल्याने ती काढून स्वच्छ करता येत नाही. त्यामुळे मग ती अन्नपदार्थ सांडून आणखीनच काळवंडून जाते.

ठळक मुद्देकमी मेहनतीत डाग काढून टाकायचे असतील आणि गॅस चकाचक करायचा असेल, तर हे काही उपाय करून बघा. 

घरातल्या सगळ्या मंडळींचं आरोग्य ज्यावर अवलंबून असतं ते स्वयंपाक घर, ओटा आणि गॅस या गोष्टी नेहमी चकाचक आणि स्वच्छच पाहिजेत. या तिन्ही गोष्टींवर घरातल्या महिलेचे स्वच्छतेकडे किती लक्ष आहे, याची पारख केली जाते. हल्ली नव्या प्रकारचे गॅस मिळतात. या गॅसच्या बर्नरच्या बाजूला जी स्टीलची प्लेट असते, ती निघत नाही. त्यामुळे दूध, चहा असं काहीही उतू गेलं, तरी ते बर्नरच्या बाजूला असणाऱ्या प्लेटवर जमा होतं. शिवाय काही अन्नपदार्थही सांडतात. ते नीट स्वच्छ करता आले नाही, तर त्याचे काळे डाग (How to clean stains on gas plate) तसेच पडून राहतात आणि दिवसेंदिवस अधिकच पक्के होत जातात. कमी मेहनतीत हे डाग काढून टाकायचे असतील आणि गॅस चकाचक करायचा असेल, तर हे काही उपाय करून बघा. 

 

गॅस बर्नरची प्लेट स्वच्छ करण्याचे उपाय१. कोल्ड्रिंक आणि तुरटीएक वाटी कोणतंही कोल्ड्रिंक घ्या. त्यातला सोडा उडालेला नसावा. त्यात २ चमचे तुरटी पावडर टाका.

अशी कंजूस बहीण बाई! भावाला आइस्क्रिम खावू घालायचं म्हणून ७- ८ दुकानं फिरवले पण..

हे मिश्रण व्यवस्थित हलवून गॅसवर पडलेल्या काळ्या डागांवर टाका. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर एखाद्या ब्रशने ते घासून घ्या. डाग निघाला नाही, तर पुन्हा एकदा त्यावर कोल्ड्रिंग टाका आणि पुन्हा घासा. डाग स्वच्छ होतील.

 

२. लिंबू आणि तुरटीलिंबू आणि तुरटी यांचा उपयोग करूनही गॅसवरचे डाग स्वच्छ करता येतात. यासाठी एका वाटीत तुरटी पावडर घ्या.

व्हिएतनामच्या फूड ब्लॉगरने पहिल्यांदाच खाल्ली पाणीपुरी! पाहा पाणीपुरी तोंडात ठेवताच कसा झाला चेहरा..व्हायरल व्हिडिओ

त्यात लिंबाचा रस पिळून त्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर आधी लिंबाच्या सालीने आणि नंतर एखाद्या ब्रशने घासून डाग स्वच्छ करा.

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स