Join us  

पिवळट डाग पडल्याने वॉश बेसिन खराब दिसतं? ३ उपाय, कमी मेहनतीत वॉश बेसिन चमकेल अगदी नव्यासारखं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 1:04 PM

Home Remedies For Cleaning Wash Basin: पाण्यातल्या क्षारांमुळे वॉश बेसिनवर बऱ्याचदा पिवळट डाग दिसतात. हे डाग स्वच्छ करण्यासाठी करून बघा हे काही उपाय 

ठळक मुद्देपिवळट, काळपट डाग कमीतकमी मेहनतीत निघू शकतात. त्यासाठीच हे काही उपाय करून बघा. 

वॉश बेसिन ही प्रत्येक घरातली अगदी वारंवार वापरली जाणारी गोष्ट. त्यामुळे दिवसांतून बराच वेळ ते ओलसर असतं. अशात जर पाणी क्षारयुक्त असेल तर त्या क्षारांचा परिणाम बेसिनवर होतो आणि बेसिनवर पिवळट, काळपट डाग (yellowish stains on wash basin) दिसू लागतात. सुरुवातीला आपण अगदी काळजीपुर्वक ते घासून काढतो. पण दररोज एवढा वेळ देणं शक्य होत नाही. मग नंतर नंतर डाग अधिक पक्के होत जातात आणि मग वॉश बेसिन खूपच घाण दिसू लागतं. असे ही पिवळट, काळपट डाग कमीतकमी मेहनतीत निघू शकतात (How to clean wash basin with minimum efforts?). त्यासाठीच हे काही उपाय करून बघा. 

वॉश बेसिनवरचे डाग स्वच्छ करण्याचे उपाय१. इनोवॉश बेसिनवरचे डाग काढून टाकण्यासाठी इनो चा वापर करू शकता. यासाठी एक वाटी पाण्यात १ टेबलस्पून इनो टाका. मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि वॉश बेसिनवरच्या डागांवर टाका.

मायक्रोवेव्हची काच भुरकट झाली? २ सोपे उपाय, काच चटकन होईल स्वच्छ- चकचकीत

५ ते ७ मिनिटे ते तसंच राहू द्या. त्यानंतर त्यावर थोंडंसं पाणी शिंपडा आणि तारेच्या घासणीने किंवा ब्रशने डाग घासून काढा. 

 

२. बोरेक्स पावडर३ चमचे बोरेक्स पावडर, एका लिंबाचा रस आणि काही थेंब पाणी एका वाटीमध्ये एकत्र करा आणि त्याची जरा घट्ट पेस्ट बनवा. ज्या ठिकाणी डाग पडले असतील त्याठिकाणी ही पेस्ट लावून घ्या.

थंडीत त्वचा कोरडी पडली? अंगावर पुरळ आली, खाज सुटली? ४ उपाय, त्वचेच्या तक्रारी कमी

त्यानंतर ७ ते ८ मिनिटांनी ब्रश किंवा तारेची घासणी घेऊन डाग घासून काढा. हा उपाय करताना हातामध्ये ग्लोव्ह्ज घालणं गरजेचं आहे.  

 

३. व्हिनेगर आणि लिंबूया दोघांचा एकत्रित वापरही वॉश बेसिनवरचे डाग काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतो.

नैसर्गिक पद्धतीने बॉडी डिटॉक्स करणारी योगमुद्रा, वेटलॉससाठीही होईल फायदा- बघा कशी करायची

यासाठी व्हिनेगर आणि लिंबू २: १ या प्रमाणात एका वाटीमध्ये एकत्र करा. हे मिश्रण डागांवर टाका आणि ७ ते ८ मिनिटांनंतर डाग घासून काढा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी