Join us  

इलेक्ट्रिक बल्ब स्वच्छ करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, नाहीतर बसायचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2023 8:00 PM

Cleaning Tips: How To Keep Your Light Bulbs & Lamps इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करताना अतिशय काळजी घ्यायला हवीच

इलेक्ट्रिक बल्बचा वापर प्रत्येक घरात, प्रत्येक चौकात, जिथे अंधार आहे तिथे - तिथे याचा वापर होतो. रात्रीच्या वेळी  इलेक्ट्रिक बल्बची गरज लागतेच. इलेक्ट्रिक बल्बशिवाय रात्री घरात अंधार होतो. त्यासाठी आपण विशेष वीज बिल देखील भरतो. हे बल्ब भिंतीवर वर्षानुवर्षे टिकतात.

बहुतांश इलेक्ट्रिक बल्ब छताच्या उंचीवर लावले जाते. हे बल्ब उंचावर असल्याने आपण त्यांना स्वच्छ करण्याची तसदी घेत नाही. इलेक्ट्रिक बल्बकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते अधिक कळकट - घाणेरडे दिसू लागतात. यासह प्रकाश देखील कमी होतो. त्यामुळे वेळच्या वेळी त्याची साफाई करणे आवश्यक आहे(Cleaning Tips: How To Keep Your Light Bulbs & Lamps).

इलेक्ट्रिक बल्ब साफ करताना घ्यावयाची काळजी

सध्या इलेक्ट्रिक बल्ब व्यतिरिक्त एलईडी आणि सीएफएलचे बल्ब वापरण्यात येत आहे. जुन्या बल्बच्या तुलनेत नवीन बल्ब जास्त प्रकाश देतात. हे  बल्ब वारंवार बदलण्याची आवश्यकता पडत नाही, पण त्यांना नियमित साफ करण्याची गरज आहे.

कोल्ड ड्रिंक उरले तर फेकू नका? कळकट टाइल्स ते गंजलेले नळ होतील स्वच्छ, ३ ट्रिक्स

- इलेक्ट्रिक बल्ब साफ करताना सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. प्रथम, वीज बंद करा, त्यामुळे अपघात आणि विजेचा धोका टाळता येईल.

- बल्ब बर्‍याचदा गरम होतात, म्हणून एकदा पॉवर बंद केल्यावर, काही मिनिटानंतर बल्ब काढा.

- साफ करताना बल्ब होल्डरमधून बाहेर काढा, कारण होल्डरमध्ये जोडलेले बल्ब स्वच्छ करणे अवघड जाते. व बल्ब फुटण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

- बल्ब नेहमी कोरड्या कापडाने किंवा डस्टरने स्वच्छ करा, ओले कापड वापरणे धोकादायक ठरू शकते. ओल्या कपड्याने गरम बल्ब साफ केला तर, त्याचा स्फोट होऊ शकतो. बल्ब स्वच्छ करण्यासाठी कोरडे मायक्रोफायबर कापडाचा वापर करा.

जेवलीस का? J1 झाले का विचारणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिला रट्टा, पोस्ट व्हायरल

- बल्ब स्वच्छ झाल्यानंतर तो परत होल्डरमध्ये लावा, होल्डरमध्ये बल्ब नीट बसला आहे की नाही हे तपासा, काही मिनिटानंतर स्वीच चालू करा.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया