Lokmat Sakhi >Social Viral > Cleaning Tips : किचनच्या टाइल्स सतत खराब होतात, साफ करण्याचे ५ सोपे उपाय

Cleaning Tips : किचनच्या टाइल्स सतत खराब होतात, साफ करण्याचे ५ सोपे उपाय

Cleaning Tips : ज्याठिकाणी आपण सतत काही ना काही खायला बनवतो ती जागा स्वच्छ तर असायलाच हवी. पण ती स्वच्छ करताना अनेकदा आपल्याला थकायला होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 02:30 PM2022-04-04T14:30:29+5:302022-04-04T14:33:15+5:30

Cleaning Tips : ज्याठिकाणी आपण सतत काही ना काही खायला बनवतो ती जागा स्वच्छ तर असायलाच हवी. पण ती स्वच्छ करताना अनेकदा आपल्याला थकायला होते.

Cleaning Tips: Kitchen tiles are constantly deteriorating, 5 easy ways to clean | Cleaning Tips : किचनच्या टाइल्स सतत खराब होतात, साफ करण्याचे ५ सोपे उपाय

Cleaning Tips : किचनच्या टाइल्स सतत खराब होतात, साफ करण्याचे ५ सोपे उपाय

Highlightsसाबणाचे पाणी लावून ठेवल्याने डाग सहज निघून येण्यास मदत होईल. इतर कामांप्रमाणेच साफसफाई हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे

साफसफाई हा महिलांच्या कामातील एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे दिसताना त्यांनी फक्त स्वयंपाक तर केला असे वाटत असले तरी साफसफाई ही त्यातील न बोलली जाणारी महत्त्वाची गोष्ट असते. साफसफाई नसेल तर आपल्यालाही घर किळसवाणे वाटू लागते. इतकेच नाही तर आरोग्याच्यादृष्टीनेही ते चांगले नसते. किचन ओटा, गॅस, सिंक आणि ओट्याच्या वर असणाऱ्या टाइल्स यांची साफसफाई (Cleaning Tips) हे महिलांच्या दैनंदिन कामांमधील एक महत्त्वाचे काम असते. ज्याठिकाणी आपण सतत काही ना काही खायला बनवतो ती जागा स्वच्छ तर असायलाच हवी. पण ती स्वच्छ करताना अनेकदा आपल्याला थकायला होते. 

(Image : Google)
(Image : Google)

पदार्थांना फोडणी देताना, कुकरच्या शिट्टीतून आणि इतरही अनेक कारणांनी किचन ओट्याच्या मागील टाइल्स खराब होतात. एकदा त्या खराब व्हायला लागल्या की वेळच्या वेळी साफ केल्या नाहीत तर हा थर साठत जातो आणि नंतर हे साफ करणे आणखी अवघड होऊन बसते. रोजच्या रोज हे साफ केले नाही तर नंतर हे डाग काही केल्या निघत नाहीत. पण असे होऊ नये म्हणून नियमितपणे सोप्या पद्धतीने हे डाग कसे घालवायचे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करुन या टाइल्स आपण स्वच्छ आणि चकचकीत ठेवू शकतो. 

१. बेकींग सोडा 

बेकिंग सोडा ज्याप्रमाणे काही पदार्थांमध्ये वापरला जातो. त्याचप्रमाणे घराच्या स्वच्छतेसाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. त्यातील एक्सफॉलिएटींग गुणधर्म घराची साफसफाई करण्यासाठी उपयुक्त ठरतात. बेकींग सोडा पाण्यात घालून त्या पाण्याने टाइल्स धुतल्यास त्या चांगल्या साफ होतात. इतकेच नाही तर बेकिंग सोड्यामध्ये लिंबू घातल्यास त्याचा आखी चांगला फायदा होतो. यामुळे फोडणीचे किंवा इतर न जाणारे डाग निघण्यास मदत होते.

२. स्टेन क्लिनर

हल्ली बऱ्याच ठिकाणी बोअरचे पाणी असते. हे पाणी थोडे जड असल्याने फरशी किंवा टाइल्सचे डाग साध्या पाण्याने किंवा साबणाने निघत नाहीत. तसेच आपण रोजच्या धावपळीत ओटा रोज धुतोच असे नाही. त्यामुळेही हे डाग वाळल्यानंतर निघणे अवघड जाते. यासाठी हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन क्लिनरही मिळतात, ते वापरल्यास डाग पटकन निघतात. 

३. व्हिनेगर

व्हिनेगर हा टाइल्सवरील डाग निघण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे. दोन कप विनेगरमध्ये दोन कप पाणी मिसळा. हे मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून घ्या काही वेळाने हा स्प्रे स्वयंपाक घरातील चिकट टाइल्सवर मारा. थोडावेळ टाईल्स तशाच ठेवा. नंतर एखाद्या स्वच्छ कापडाच्या मदतीनं हलक्या हाताने टाईल्स स्वच्छ करा. यासाठी जास्त कष्ट न घेता व्हिनेगरमुळे टाईल्सवरचे डाग निघून जाण्यास मदत होईल. 

(Image : Google)
(Image : Google)

४. हायड्रोजन पॅरॉक्साइड 

हायड्रोजन पॅरॉक्साइड हा टाइल्सवरचे डाग काढण्याचा उत्तम उपाय आहे. थेट हे लिक्वीड लावून पुसण्यापेक्षा ते पाण्यात मिसळा. एका कापडाच्या बोळ्याने किंवा स्पंजने हे मिश्रण ओट्याच्या टाइल्सवर लावून ठेवा. त्यानंतर ३ ते ४ तासांनी मऊ फडक्याने टाइल्स पुसून घ्या. अशाप्रकारे लावून ठेवल्याने डाग जर घट्ट आणि जास्त चिकट झाले असतील तर ते निघण्यास मदत होईल.

५. साबणाचे पाणी 

घरात वरील कोणतेही घटक नसतील तर गरम पाण्यात कोणत्याही साबणाची पावडर घाला. हे मिश्रण ओल्या फडक्याने टाइल्सवर सगळीकडे लावून ठेवा. काही वेळाने ओल्या फडक्याने टाइल्स पुसून घ्या. साबणाचे पाणी लावून ठेवल्याने डाग सहज निघून येण्यास मदत होईल. 

Web Title: Cleaning Tips: Kitchen tiles are constantly deteriorating, 5 easy ways to clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.