Lokmat Sakhi >Social Viral > Cleaning Tips : ओटा कितीही स्वच्छ केला तरी झुरळं, मुंग्या होतातच? ओटा चटकन स्वच्छ करण्याचे ५ उपाय...

Cleaning Tips : ओटा कितीही स्वच्छ केला तरी झुरळं, मुंग्या होतातच? ओटा चटकन स्वच्छ करण्याचे ५ उपाय...

Cleaning Tips : ओटा साफ करणे हे महिलांच्या दिवसभरातील कामांपैकी एक महत्त्वाचे काम. पण ते काम नीट झाले नाही तर आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्यादृष्टीने ते चांगले नाही. ओटा साफ करण्याचे काम झटपट होण्यासाठी काही सोप्या टीप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 11:27 AM2022-02-21T11:27:19+5:302022-02-21T11:46:02+5:30

Cleaning Tips : ओटा साफ करणे हे महिलांच्या दिवसभरातील कामांपैकी एक महत्त्वाचे काम. पण ते काम नीट झाले नाही तर आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्यादृष्टीने ते चांगले नाही. ओटा साफ करण्याचे काम झटपट होण्यासाठी काही सोप्या टीप्स...

Cleaning Tips: No matter how much you clean the oats, do you get cockroaches and ants? 5 Ways to Clean Ota Quickly ... | Cleaning Tips : ओटा कितीही स्वच्छ केला तरी झुरळं, मुंग्या होतातच? ओटा चटकन स्वच्छ करण्याचे ५ उपाय...

Cleaning Tips : ओटा कितीही स्वच्छ केला तरी झुरळं, मुंग्या होतातच? ओटा चटकन स्वच्छ करण्याचे ५ उपाय...

Highlightsलिंबाचा रस हाही टाईल्स साफ करण्यासाठी उत्तम उपाय असल्याने अगदी सहज उपलब्ध होणारे लहानसे लिंबू तुमच्या या स्वच्छतेच्या कामात तुम्हाला चांगली मदत करेल.वेळच्या वेळी योग्य पद्धतीने साफसफाई केली तर नंतर काम वाढत नाही, त्यादृष्टीने कामाचे नियोजन व्हायला हवे

किचन ओटा (Kitchen tips) म्हणजे घरातील गृहिणींसाठी सर्वाधिक वेळ वावरण्याची जागा. सकाळच्या पहिल्या चहापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्यातील अनेकींचा घरातील बहुतांश वेळ हा ओट्यापाशी जातो. दिवसभर ज्याठिकाणी पदार्थ तयार केले जातात ती जागा साफ असणेही तितकेच महत्त्वाचे असते. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याबरोबरच स्वच्छतेच्यादृष्टीने ओट्याची साफसफाई हे (Cleaning Tips) आपल्या रोजच्या आणि आठवड्याच्या कामांमधील एक महत्त्वाचे काम. बरेचदा आपण घाईत स्वयंपाक करतो आणि ऑफीसला किंवा इतर कामांसाठी धावतच ओटा साफ करतो. पण त्यामुळे तो म्हणावा तसा साफ होतोच असे नाही. मग अन्नाचे काही ना काही कण राहीलेले असतील की त्याठिकाणी होणाऱ्या मुंग्या आणि झुरळे नेहमीचीच. पण असे होऊ नये असे वाटत असेल तर ओटा आणि त्याच्या मागे असलेल्या टाईल्स साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स (Tricks and tips for cleaning) माहित असणे फायद्याचे ठरते. 

(Image : Google)
(Image : Google)

१. कणिक मळणे, भाज्या चिरणे, फोडण्या देणे यांसारख्या एकाहून एक कामांमुळे किंवा कधी तेल, दूध किंवा आणखी काही सांडल्यामुळे ओटा आणि टाईल्स चिकट किंवा मेचट होतात. त्या वेळच्या वेळी साफ केल्या नाहीत तर हा थर वाढत जातो आणि नंतर ओटा साफ करणे अतिशय जिकरीचे होऊन बसते. त्यामुळे ओट्य़ावर, गॅसवर किंवा अगदी टाईल्सवर एखादी गोष्ट सांडली तर ती वेळच्या वेळी साफ करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते वाळून न जाता लगेच निघण्यास मदत होते.

२. व्हिनेगर हा ओटा साफ करण्यासाठी एक उत्तम उपाय ठरु शकतो. स्वच्छ कापड व्हिनेगरमध्ये बुडवून त्याने ओटा पुसल्यास ओटा चकचकीत होण्यास मदत होते. याशिवाय व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन स्प्रे बॉटलमध्ये घेऊन ओट्यावर आणि टाईल्सवर स्प्रे  करावे, त्यानंतर ओल्या फडक्याने ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. 

३. टाईल्सवर जर पिवळे डाग पडले असतील तर मीठ आणि टर्पेंटाईन तेलाने स्वच्छ करा. लिक्विड अमोनिया आणि साबणाच्या मिश्रणाने टाईल्सवरील डाग लगेच स्वच्छ होतात. लिंबाचा रस हाही टाईल्स साफ करण्यासाठी उत्तम उपाय असल्याने अगदी सहज उपलब्ध होणारे लहानसे लिंबू तुमच्या या स्वच्छतेच्या कामात तुम्हाला चांगली मदत करेल.

(Image : Google)
(Image : Google)

४. अनेकदा टाइल्सचे कोपरे काळे होतात किंवा त्यात बारीक कणांची घाण साचते. आपण ओटा कितीही पुसला आणि साफ केला तरी कोपऱ्यातील ही घाण निघत नाही. त्यामुळे ओट्याचे कोपरे साफ करायचे असतील तर गरम पाण्यात हायड्रोजन पॅराक्साइड मिक्स करुन त्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट कोपऱ्यांवर लावा आणि ब्रशने घासून घ्या. थोडा वेळ तसेच ठेऊव ओल्या फडक्याने हे कोपरे साफ करा. 

५. ब्लिचिंग पावडर हा साफसफाई करण्यासाठी एक उत्तम उपाय ठरु शकतो. टाईल्सला नव्यासारखी चमक येण्यासाठी ब्लिचिंग पावडरचटा चांगला उपयोग होतो. रात्री झोपताना ओट्यावर आणि टाईल्सला सर्व ठिकाणी ब्लिचिंग पावडर लावून ठेवायची आणि सकाळी उठल्यावर ओटा पाण्याने किंवा ओल्या फडक्याने साफ करायचा. त्यामुळे त्यावर साठलेले किटण निघून जाण्यास मदत होते. 

Web Title: Cleaning Tips: No matter how much you clean the oats, do you get cockroaches and ants? 5 Ways to Clean Ota Quickly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.