Lokmat Sakhi >Social Viral > Cleaning Tips : कितीही घासलं तरी सिंक चिकटच राहतं? सिंक चकाचक करण्याच्या ८ सोप्या टिप्स

Cleaning Tips : कितीही घासलं तरी सिंक चिकटच राहतं? सिंक चकाचक करण्याच्या ८ सोप्या टिप्स

Cleaning Tips : दिवसभर वापरात असलेल्या सिंकमधून कधी वास येतो, तर कधी ते तुंबते, कधी कितीही घासलं तरी ते स्वच्छ झाल्यासारखे वाटत नाही, यासाठीच सिंक साफ करण्याच्या खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 03:23 PM2022-02-13T15:23:13+5:302022-02-13T15:39:01+5:30

Cleaning Tips : दिवसभर वापरात असलेल्या सिंकमधून कधी वास येतो, तर कधी ते तुंबते, कधी कितीही घासलं तरी ते स्वच्छ झाल्यासारखे वाटत नाही, यासाठीच सिंक साफ करण्याच्या खास टिप्स

Cleaning Tips: No matter how much you rub, the sink stays sticky? 8 Simple Tips to Shine | Cleaning Tips : कितीही घासलं तरी सिंक चिकटच राहतं? सिंक चकाचक करण्याच्या ८ सोप्या टिप्स

Cleaning Tips : कितीही घासलं तरी सिंक चिकटच राहतं? सिंक चकाचक करण्याच्या ८ सोप्या टिप्स

Highlightsरात्रीच्या वेळी झोपताना सिंकमध्ये आवर्जून डांबर गोळी ठेवावी. दिवसभर सिंकचा वापर करत असताना ही गोळी बाजूला काढून ठेवावीबाजारात मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश, गॉज, पावडरी, लिक्विड सोप यांचा सिंक साफ करण्यासाठी आवर्जून वापर करावा.

दिवसभर खाल्लेली भांडी, त्यात राहीलेले थोडे खरकटे, प्यायच्या पाण्याचे ग्लास, चमचे, कपबशा अशा सतत काही ना काही वस्तू येऊन पडत असतात ते किचनमधील सिंक. पाणी, खरकडे यांसारख्या गोष्टींमुळे सतत ज्याठिकाणी खराब होते असे किचनमधील (Kitchen Tips) एक महत्त्वाचे ठिकाण. रोजच्या धावपळीत या सिंकची सफाई (Cleaning Tips) करायची राहून गेली तर मात्र वीकेंडला तरी हे सिंक घासण्यावाचून पर्याय नसतो. नाहीतर नळाच्या मागची भिंत, आजुबाजूचे सगळेच खराब व्हायला लागते आणि याठिकाणी डास, चिलटं यांचं साम्राज्य वाढायला लागतं. एकदा का ही घाण वाढली की ती साफ करणे अवघड होऊन बसते. इतकेच नाही तर त्यामुळे याठिकाणी दुर्गंधही यायला लागतो. त्यामुळे वेळच्या वेळी या ठिकाणाची सफाई केलेली केव्हाही चांगली. आता सिंक साफ करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी जाणून घेऊया...

(Image : Google)
(Image : Google)

१. सिंकमध्ये ज्याठिकाणहून पाणी जाते त्याठिकाणी खरकटे अडकू नये यासाठी एक वेगळ्या प्रकारची जाळी बसवून एक सोय केलेली असते. पण त्यातूनही खरकटे आत जातेच. अशावेळी सिंकचा पाईप तुंबू नये यासाठी एक चांगल्या प्रतीची जाळी याठिकाणी बसवावी. यामध्ये स्टील, प्लास्टीक असे बरेच पर्याय उपलब्ध असतात. पण स्टीलच्या जाळीची तार अडकलेले खरकटे काढताना हाताला लागू शकते. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन ती वेळीच बदललेली केव्हाही चांगली. तसेच प्लास्टीकच्या जाळीचा पर्यायही केव्हाही चांगला असतो. ती घासल्यानंतर स्वच्छ होत असल्याने आपण ती बराच काळ वापरु शकतो. 

२. सिंकला काही कोपरे असण्याची शक्यता असते. अशावेळी सिंक साफ करण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे ब्रश किंवा काही इतर साधने बाजारात सहज उपलब्ध असतात. या सादनांचा आवर्जून वापर करावा. यामुळे आपला वेळ तर वाचतोच पण साफसफाईही अतिशय चांगली होते. 

३. सिंक साफ करण्यासाठी बाजारात बरेच वेगळ्या प्रकारचे लिक्विड, पावडर मिळतात. त्यांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास सिंक चिकट राहणार नाही. तसेच सिंकच्या आतले स्टील सर्व बाजूंनी स्वच्छ राहील यासाठी या पावडरी किंवा लिक्वीड उपयुक्त ठरते. 

४. सिंकच्या बाजूला उडणारे खरकटे, साबणाचे थेंब किंवा आणखी काही वेळच्या वेळी कापडाने किंवा एखाद्या चांगल्या मॉबने पुसून घ्यावे. जेणेकरुन ते तसेच साचून राहणार नाही. ते काही दिवस तसेच राहीले तर याठिकाणी मुंग्या, झुरळे होतात आणि ती ओटाभर किंवा खाली ट्रॉलीमध्ये अगदी सहज पसरतात. 

५. अनेकदा आपण कुकरमध्ये काही ना काही शिजवतो. किंवा पातेल्यातही काही उकडून घेतो. त्यावेळी त्याचे गरम पाणी सिंकमध्ये टाकावे. जेणेकरुन याठिकाणी असणारी घाण सहज निघण्यास मदत होईल. दर दोन ते तीन दिवसांनी गरम पाण्यात लिक्विड सोप घालून त्याने सिंक धुतल्यास ते साफ होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

६. बेकींग सोडा, लिंबाची पावडर यांसारख्या गोष्टींचा वापर केला तरी सिंक चमकायला मदत होते. त्यामुळे नकळत आपल्याला ओट्यापाशी आणि एकूणच किचनमध्ये स्वच्छ वाटते. यामुळे घरातील दुर्गंधीही दूर होण्यास मदत होते. नेहमी डिटर्जंट किंवा इतर काही वापरण्यापेक्षा या घरगुती उपायांचाही वापर करुन पाहावा. 

७. ड्रेनेज साफ होण्याची एक पावडर बाजारात मिळते. ती पावडर दर पंधरा दिवसांनी सिंकमध्ये घालून ठेवावी. यामुळे सिंक तर साफ होतेच पण त्याचे पाणी जाण्याचा पाईपही साफ होण्यास मदत होते. त्यामुळे या पाईपला आतल्या बाजुने काही खरकटे किंवा इतर गोष्टी चिकटल्या असतील तर त्या सहज निघून आल्याने सिंक स्वच्छ राहते. 

८. रात्रीच्या वेळी झोपताना सिंकमध्ये आवर्जून डांबर गोळी ठेवावी. दिवसभर सिंकचा वापर करत असताना ही गोळी बाजूला काढून ठेवावी आणि पुन्हा रात्री सिंकमध्ये ठेवावी. यामुळे सिंकमधील वास जाण्यास मदत होते. 

Web Title: Cleaning Tips: No matter how much you rub, the sink stays sticky? 8 Simple Tips to Shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.