Lokmat Sakhi >Social Viral > नव्याकोऱ्या कपड्यांना दुसऱ्या कपड्यांचा रंग लागला तर..? झटपट रंग काढण्याच्या 3 सोप्या टिप्स

नव्याकोऱ्या कपड्यांना दुसऱ्या कपड्यांचा रंग लागला तर..? झटपट रंग काढण्याच्या 3 सोप्या टिप्स

Clothe Cleaning Tips Stain on Cloths : घरच्या घरी काही सोप्या पद्धतींनी कपड्यांना लागलेला दुसऱ्या कपड्यांचा रंग काढता आला तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2022 11:39 AM2022-08-28T11:39:27+5:302022-08-28T11:41:46+5:30

Clothe Cleaning Tips Stain on Cloths : घरच्या घरी काही सोप्या पद्धतींनी कपड्यांना लागलेला दुसऱ्या कपड्यांचा रंग काढता आला तर?

Clothe Cleaning Tips Stain on Cloths : If new clothes get the color of other clothes..? 3 easy tips for quick color removal | नव्याकोऱ्या कपड्यांना दुसऱ्या कपड्यांचा रंग लागला तर..? झटपट रंग काढण्याच्या 3 सोप्या टिप्स

नव्याकोऱ्या कपड्यांना दुसऱ्या कपड्यांचा रंग लागला तर..? झटपट रंग काढण्याच्या 3 सोप्या टिप्स

Highlightsहायड्रोजन पॅरॉक्साइडमुळे कपडे खराबही होत नाहीत, त्यामुळे हा उत्तम उपाय ठरतो

कपडे धुणे हे आपल्या रोजच्या कामांपैकी एक गोष्ट असते. सणावाराच्या निमित्ताने किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण नवीन कपडे घालतो. रात्री उशीरा घरी आलो किंवा घाईघाईत कपडे बदलले तर आपण ते कपडे तसेच धुवायला टाकतो. अशावेळी आपल्या नव्या कपड्यांना आधीच्या जुन्या कपड्यांपैकी एखाद्या कपड्याचा रंग लागतो (Stain on Cloths). नवीन महागडे कपडे आणि रंग जाणारे कपडे खरंतर वेगळे भिजवायला हवेत. पण घाईघाईत आपण हे कपडे चुकून एकत्र भिजवले तर मात्र आपल्या कपड्यांची पार वाट लागते. गडबडीत आपल्याकडून ही चूक झाली की नव्या, महागड्या कपड्यांचे काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो (Clothe Cleaning Tips). 

(Image : Google)
(Image : Google)

फिक्या रंगाच्या कपड्यांवर गडद रंगाचे डाग पडले की हे कपडे एकतर ड्रायक्लिनला टाकावे लागतात नाहीतर ते टाकून देण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र बरेचदा ड्रायक्लिननेही हे डाग निघतातच असे नाही. तसंच ड्रायक्लीन कऱण्यासाठी सध्या खूप जास्त प्रमाणात पैसे मोजावे लागतात. अशावेळी घरच्या घरी काही सोप्या पद्धतींनी कपड्यांना लागलेला दुसऱ्या कपड्यांचा रंग काढता आला तर? पाहूयात अशाच काही सोप्या टिप्स ज्यामुळे हा रंग काढता येतो... 

१. अल्कोहोल 

अल्कोहोल म्हटल्यावर आपल्याला साधारणपणे मद्य वाटते, पण बाजारात एकप्रकारचे वेगळे अल्कोहोल मिळते. त्यामुळे कपड्यांवरचे इतर रंगाचे डाग जाण्यास मदत होते. रबिंग अल्कोहोलमध्ये असलेल्या घटकांमुळे हे डाग जास्त कष्ट न घेता सहज निघतात. हे अल्कोहोल कपड्यांवर घालून कपडे घासल्यास अगदी सहज डाग निघून जाण्यास मदत होते. 

२. बेकींग सोडा 

बेकींग सोडा हा स्वच्छतेच्या अनेक कामांसाठी उपयुक्त ठरणारा घटक आहे. कपड्यांवरचे डाग काढण्यासाठीही बेकींग सोड्याचा चांगला उपयोग होतो. १ लीटर पाण्यामध्ये बेकींग सोडा आणि १ किंवा २ चमचे लिंबाचा रस घालून त्यामध्ये डाग पडलेले कपडे भिजवून ठेवायचे. कपडे भिजवल्यानंतर २० मिनीटांत हे डाग निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. हायड्रोजन पॅरॉक्साइड

हायड्रोजन पॅरॉक्साइडमुळे फक्त नवीन कपड्यांवरचे किंवा इतर कपड्यांचे डाग निघतात असं नाही. तर कपड्यांवर तेलाचे, शाईचे किंवा इतर कसलेही डाग पडले तर ते निघण्यास मदत होते. विशेष म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साइडमुळे कपडे खराबही होत नाहीत. 

 

Web Title: Clothe Cleaning Tips Stain on Cloths : If new clothes get the color of other clothes..? 3 easy tips for quick color removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.