Lokmat Sakhi >Social Viral > वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही कुबट वास येतो? ४ टिप्स, कपडे चकाचक, दुर्गंध गायब

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही कुबट वास येतो? ४ टिप्स, कपडे चकाचक, दुर्गंध गायब

Clothes Stink After Washing? Try These Tips for Cleaner-smelling Laundry : कपडे धुवूनही कुबट वास येत असेल तर, धुताना ४ गोष्टी लक्षात ठेवा; कपड्यांना नेहमी येईल सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2023 02:49 PM2023-12-23T14:49:15+5:302023-12-23T15:05:28+5:30

Clothes Stink After Washing? Try These Tips for Cleaner-smelling Laundry : कपडे धुवूनही कुबट वास येत असेल तर, धुताना ४ गोष्टी लक्षात ठेवा; कपड्यांना नेहमी येईल सुगंध

Clothes Stink After Washing? Try These Tips for Cleaner-smelling Laundry | वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही कुबट वास येतो? ४ टिप्स, कपडे चकाचक, दुर्गंध गायब

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही कुबट वास येतो? ४ टिप्स, कपडे चकाचक, दुर्गंध गायब

कामं जलद गतीने व्हावे यासाठी आजकाल गृहिणी स्मार्ट वर्क करतात. कपडे धुण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत प्रत्येक गोष्टींसाठी सध्या मशीन उपलब्ध आहे. मशीनमुळे कामं झटपट जास्त मेहनत न घेता लवकर पूर्ण होतात. पण बऱ्याचदा मशीनमध्ये मनासारखं काम होत नाही. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर कुबट वास येतो (Washing Machine). कुबट वासामुळे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले गेले आहेत की नाही? असा प्रश्न निर्माण होतो.

अनेक वेळा चांगला डिटर्जंट आणि चांगल्या कंपनीचे वॉशिंग मशिन वापरल्यानंतरही कपड्यांमध्ये एकप्रकारचा वास येत राहतो. या दुर्गंधीमुळे आपली पूर्ण मेहनत, वीज आणि पाण्याची नासाडी झाली असल्याची भावना मनात येते (Cleaning Tips).  कपड्यांना वास येण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की ओलसरपणा, डिटर्जंटचा वास किंवा कपडे नीट साफ न होणे. पण या दुर्गंधीपासून सुटका हवी असेल तर, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना काही टिप्स लक्षात ठेवा(Clothes Stink After Washing? Try These Tips for Cleaner-smelling Laundry).

कपडे पूर्णपणे ड्राय करा

स्‍पीड क्‍वीन डॉट कॉम. या वेबसाईटनुसार, वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्यानंतरही वास येत असेल, तर ते पुन्हा धुण्याऐवजी कडक उन्हात पूर्णपणे सुकवून घ्या. कडक उन्हात कपडे वाळवल्याने त्यातील कुबट वास निघून जाईल.

थर्टी फस्ट घरीच साजरा करणार? ६ आयडिया, सेलिब्रेशन होईल यादगार, पार्टी होईल जबरदस्त

व्हिनेगर

अनेकदा बुरशीमुळेही कपड्यातून दुर्गंधी येऊ लागते. काहीवेळेला कपडे धुतल्यानंतरही बुरशी लवकर निघत नाही. शिवाय फक्त डिटर्जंटच्या वापरानेही बुरशी निघत नाही. बुरशी लागलेले कपडे स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. कपडे धुताना वॉशिंग मशिनमध्ये डिटर्जंटसोबत थोडेसे व्हिनेगर टाकल्याने कपडे चांगले स्वच्छ होतात, आणि बॅक्टेरियाही नष्ट होतात.

मशीन स्वच्छ करा

वॉशिंग मशिनमध्ये वाढणारे बॅक्टेरिया किंवा जंतू हे कपड्यांमधील दुर्गंधीचे कारण असू शकतात. कपड्यांसोबतच वॉशिंग मशीनच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. दर १५ दिवसानंतर मशीनची साफसफाई करणे आवश्यक आहे. अनेक वेळा वॉशिंग मशिनच्या रबरवर डिटर्जंट किंवा घाण जमा होते, त्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. अशावेळी कपडे धुतल्यानंतर त्यातून कुबट वास येतो.  त्यामुळे वॉशिंग मशिन साफ करणं गरजेचं आहे.

कॉफी आणि बेकिंग सोडा, २ उपाय- घरातल्या टॉयलेटमधली दुर्गंधी होईल गायब-राहील स्वच्छ

डिटर्जंट बदला

बऱ्याचदा आपण एकाच प्रकारच्या डिटर्जंटचा वापर करतो. त्याच डिटर्जंटने कपडे धुतल्याने कपड्यांना दुर्गंधी येते. कपड्यांमधून गंध दूर करण्यासाठी डिटर्जंट बदलून पाहा. दुसऱ्या ब्रॅण्डच्या  डिटर्जंटचा वापर करून पाहा. शिवाय ग्रॅन्युलर डिटर्जंटऐवजी आपण लिक्विड डिटर्जंटचा वापर करून पाहू शकता.

Web Title: Clothes Stink After Washing? Try These Tips for Cleaner-smelling Laundry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.