सध्या थंडीचा सीजन सुरु आहे. सगळीकडेच थंडीचे वातावरण असल्याकारणाने हवेत फारच गारठा जाणवतो. हिवाळ्यात आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतो. हिवाळ्यात खोबरेल तेल लावणं त्वचेच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं असतं. खोबरेल तेल त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळा आला की आपल्याला आपल्या त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. यासाठी नारळाचं तेल हा उत्तम उपाय आहे. आपल्यापैकी बरेच जण हिवाळ्यात ओठ फुटल्यास, त्वचा कोरडी पडल्यास अशा विविध कारणांसाठी खोबरेल तेलाचा वापर करतात. परंतु हिवाळ्यात बऱ्याचदा खोबरेल तेल थंडीने गोठते. काहीजण या गोठलेल्या तेलाचा आपल्या त्वचेवर असाच वापर करतात. मात्र ही योग्य पद्धत नाही. तेल पूर्णपणे वितळण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. ते पूर्णपणे वितळल्यानंतरच, चेहरा आणि त्वचेवर लावणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात हे तेल वारंवार वितळवून घेतले तरी ते सारखे गोठते. अशावेळी नक्की काय करावे हा प्रश्न आपल्यासमोर उद्भवतो. वितळवून घेतलेले खोबरेल तेल परत गोठून घट्ट होऊ नये म्हणून एक सोपा उपाय आपण करू शकतो. काय आहे तो सोपा उपाय ते समजून घेऊयात(Prevent Your Oil From Freezing In Winter Season).
नक्की काय उपाय करता येऊ शकतो ?
खोबरेल तेलात मायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसोबतच व्हिटॅमिन सी सारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्यात खोबरेल तेल त्वचेवर महागड्या क्रीमसारखे काम करते. त्यामुळे जर तुमची त्वचा खराब होत असेल किंवा त्यावर एजिंग साइन दिसू लागले असतील तर तुम्ही त्वचेवर खोबरेल तेल लावावे. हिवाळ्यात आपण खोबरेल तेल हेअर मास्क, बॉडी मॉइश्चरायझर, ओठांवर लावण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी वापरतो. असे हे बहुउपयोगी खोबरेल तेल हिवाळ्यात आपण विविध कारणांसाठी वापरतो. परंतु कधी कधी कडाक्याच्या थंडीमुळे हे तेल गोठून जाते. हिवाळ्यात हे खोबरेल तेल गोठल्यास हा उपाय नक्की ट्राय करून पहा.
वितळवून घेतलेले खोबरेल तेल परत गोठून घट्ट होऊ नये म्हणून एक सोपा उपाय indiakatadkaa या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
हिवाळ्यात खोबरेल तेल सारखेच गोठत असल्यास हा उपाय करा...
१. गोठलेले तेल एका बाऊलमध्ये काढून ते गॅसवर किंचित गरम करून संपूर्णपणे वितळवून घ्यावे.
२. खोबरेल तेल संपूर्णपणे वितळले आहे याची खात्री करून मगच त्यात १ टेबलस्पून आवळा ऑइल घालावे.
३. १ टेबलस्पून आवळा ऑइलच्या ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही तेल वापरू शकता. उदा. बदामाचे तेल, तिळाचे तेल.
४. वितळवून घेतलेल्या खोबरेल तेलामध्ये इतर कोणतेही तेल मिसळल्यास त्या तेलातील पोषक तत्व व काही घटक खोबरेल तेलामध्ये उतरतात व यामुळेच खोबरेल तेल वारंवार गोठत नाही.
५. हा उपाय नक्की घरी करून पाहा. वारंवार गोठणाऱ्या खोबरेल तेलाला हा सोपा उपाय करून सारखेच गोठण्यापासून वाचवू शकता.