Join us  

गल्लीतल्या मॅचमध्ये ‘तो’ करतोय संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेण्ट्री! अशी कॉमेण्ट्री तुम्ही कधी ऐकली-पाहिलीच नसेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2022 4:58 PM

Viral Video Of Gully Cricket: हिंदी- इंग्रजीमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्याची आपल्याला सवय असते. पण इथे चक्क अस्खलित संस्कृत भाषेत कॉमेंट्री (Commentary in Sanskrit) सुरू आहे.. 

ठळक मुद्देसंस्कृतमधली कॉमेंट्री आपल्याला कळेल की नाही, समजेल की नाही, असे वाटते. पण सोपे शब्द आणि स्पष्ट उच्चार यामुळे आपणही ती छान एन्जॉय करू शकतो. 

क्रिकेट म्हणजे करोडो भारतीयांचा अगदी आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय. मग ते वर्ल्ड कप असो किंवा मग आपलं गल्ली क्रिकेट (gully cricket).. ते अगदी गांभिर्यानेच घेतलं जातं. गल्ली क्रिकेटमध्येही प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेट खूप खूप महत्त्वाची असते. असं अगदी तल्लीन होऊन, देहभान हरपून क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटवीरांना बघणं हा खरोखरंच एक आनंद असतो. जसं जमेल तसं मोडक्या तोडक्या भाषेत गल्ली क्रिकेटची कॉमेंट्रीही रंगत असते. प्रत्येक वेळी ती ऐकताना नवी मजा येते. असाच एक क्रिकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल ( viral video of cricket Commentary in Sanskrit ) झाला आहे. 

 

lakshmi narayana B.S या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Sanskrit and cricket अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली असून तो व्हिडिओ बँगलोर शहरातला आहे.

डोक्यावर मातीचा कलश घेऊन सायकल चालवत करतेय डौलदार डान्स, बघा तरुणीचा व्हायरल व्हिडिओ

या व्हिडिओला एक- दोन दिवसांतच तब्बल दोन लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये क्रिकेट खेळणारी काही मुले दिसत आहेत, तर प्रेक्षक असणारी मुलं घराच्या गच्चीवर, बाल्कनीमध्ये, ओट्यावर बसलेली आहेत. भारताच्या इतर भागात गल्ली क्रिकेट सुरू असताना, जो काही सीन असतो, ताेच सीन या मॅचचाही आहे. फक्त कॉमेंट्री मात्र संस्कृत भाषेत सुरू आहे. हेच या मॅचचं वेगळेपण आहे.

 

कॉमेंट्री करणारी व्यक्ती अगदी शुद्ध संस्कृतमध्ये भाष्य करते आहे आणि मॅचचा हालहवाला प्रेक्षकांपर्यंत पोहाेचवत आहे. 

दसऱ्याला करा झेंडूच्या फुलांची आरास, सोप्या पण आकर्षक रांगोळ्यांचे १० सुंदर प्रकार

संस्कृतमध्ये होणारी कॉमेंट्री जशी आपल्याला मजेशीर वाटते आहे, तशीच या प्रेक्षकांनाही ती आवडते आहे. संस्कृतमधली कॉमेंट्री आपल्याला कळेल की नाही, समजेल की नाही, असे वाटते. पण सोपे शब्द आणि स्पष्ट उच्चार यामुळे आपणही ती छान एन्जॉय करू शकतो. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलऑफ द फिल्ड