किचनमध्ये काम करत असताना अनेक लहान मोठ्या समस्यांचा येतात. कधी कुकरची शिट्टी व्यवस्थित होत नाही तर कधी हाय फ्लेममुळे पदार्थ कुकराच्या तळाला लागतो आणि जळतो . (Kitchen Hacks) इतकंच नाही तर कुकरमधून डाळ बाहेर येण्याचे प्रकारही होतात. स्वंयपाक करताना कुकरमधून पाणी बाहेर आलं की कामं वाढतं आणि झाकण स्वच्छ करावं लागतं सतत असे प्रकार उद्भवल्यास कुकर मळकट दिसतो. (How to avoid water coming out from cooker whistle) कुकरमधून पाणी बाहेर येऊ नये यासाठी काही सोपे उपाय पाहूया.
१) कुकरची शिट्टी दर २ ते ३ तीन दिवसांनी साफ करत राहा. त्यात जर अन्न अडकलं असेल तर शिट्ट्या व्यवस्थित होत नाहीत. जेव्हा तुम्ही कुकरची शिट्टी व्यवस्थित स्वच्छ कराल तेव्हा ब्रशच्या मदतीनं व्यवस्थित क्लिन करा. यामुळे शिट्ट्या व्यवस्थित होतील.
२) शिट्टी गरम पाण्यात भिजवून ब्रशच्या मदतीनं स्वच्छ करा. यामुळे शिट्टी अगदी व्यवस्थित स्वच्छ होईल. तुम्ही कुकरच्या झाकणाला टिश्यु पेपरही लावू शकता. यामुळे डाळीचे पिवळे डाग त्यावर पडणार नाहीत. याव्यतिरिक्त कुकरच्या झाकणाचं रबरसुद्धा खराब झालेलं असू शकतं. रबरमुळे अतिरिक्त हवा तयार होत नाही आणि कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होतात. जर रबर लूज झाले असेल तर तो लगेचच बदला.
३) कुकरचं पाणी बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता. अशा स्थितीत कुकरच्या झाकणाच्या चारही बाजूंना तेल लावा. जेणेकरून कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही.
४) ठंड पाण्याच्या मदतीनं तुम्ही कुकरमधून बाहेर येणारं पाणी रोखू शकता. यासाठी कुकरमधून पाणी बाहेर येत असताना झाकण उघडा आणि थंड पाण्याने धुवून पुन्हा कुकरला लावा. यामुळे एस्क्ट्रा पाणी कुकरच्या आतच राहील.
५) कुकरमध्ये जास्त पाणी घातल्याने आणि कुकर हाय फ्लेमवर ठेवल्याने पाणी बाहेर येतं. यासाठी कुकरमध्ये जेवण बनवताना वेळोवेळी पाण्याचं प्रमाण तपासत राहा. याशिवाय गॅस मीडियम फ्लेमवर सेट करा. जेणेकरून कुकरमधलं पाणी बाहेर येणार नाही. कोणताही पदार्थ कुकरमध्ये बनवताना जास्त पाणी घालू नका.