Lokmat Sakhi >Social Viral > किचनमधली वेळखाऊ कामे होतील सोपी, ३ ट्रिक्स - कामे आटोपतील भरभर, टेंशन कमी...

किचनमधली वेळखाऊ कामे होतील सोपी, ३ ट्रिक्स - कामे आटोपतील भरभर, टेंशन कमी...

Cooking Tips and Tricks : आपण काही सोप्या व झटपट ट्रिक्स वापरून किचनमधील ही वेळखाऊ व किचकट काम अतिशय कमी वेळात लगेच करु शकतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2023 12:29 PM2023-09-01T12:29:25+5:302023-09-01T12:51:27+5:30

Cooking Tips and Tricks : आपण काही सोप्या व झटपट ट्रिक्स वापरून किचनमधील ही वेळखाऊ व किचकट काम अतिशय कमी वेळात लगेच करु शकतो...

Cooking Tips and Tricks To Make Everyday Cooking Easy and Hassle Free. | किचनमधली वेळखाऊ कामे होतील सोपी, ३ ट्रिक्स - कामे आटोपतील भरभर, टेंशन कमी...

किचनमधली वेळखाऊ कामे होतील सोपी, ३ ट्रिक्स - कामे आटोपतील भरभर, टेंशन कमी...

सकाळचा स्वयंपाक करायचा म्हटलं की सगळीच गडबड असते. गृहिणींची किचनमध्ये सकाळी लगबग सुरु असते. काहीवेळा सकाळचा नाश्ता, टिफिन यांत इतकी गडबड होते की काहीतरी जादू व्हावी व चुटकीसरशी सगळी काम व्हावी असं गृहिणींना वाटत असत. सकाळच्या स्वयंपाकातील खूप काही काम अशी असतात जी खूप किचकट व वेळखाऊ असतात. भाजी निवडणे, चपात्यांची कणिक मळणे, वाटण - घाटण करणे यांसारखी काम करण्यात आपला बराच वेळ जातो. 

स्वयंपाक घरातील अशी छोटी - मोठी काम चुटकीसरशी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपकरणांचा व ट्रिक्सचा वापर करतो. काहीवेळा आपल्याला अगदी २ ते ३ चपात्यांची कणिक माळायची असते तेव्हा नेमकं काय करावं हे समजत नाही. याचबरोबर किचनमधील वस्तूंची देखील तितकीच स्वच्छता ठेवावी लागते. अशा अनेक गोष्टी या किचनशी निगडित असतात. आपण काही सोप्या व झटपट ट्रिक्स वापरून किचनमधील (Try these tips to make cooking easier and hassle free) ही वेळखाऊ व किचकट काम अतिशय कमी वेळात लगेच करु शकतो. अगदी २ ते ३ चपात्या बनवण्यासाठी कणिक कशी मळावी ? कॉफीमग किंवा कपवरील चहा, कॉफीचे डाग कसे काढावेत? कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता यांसारख्या लवकर खराब होणाऱ्या वस्तू कशा दीर्घकाळासाठी स्टोअर करुन ठेवाव्यात. यासारख्या छोट्या छोट्या कामांसाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात(Cooking Tips and Tricks To Make Everyday Cooking Easy and Hassle Free).

किचनमधील काम झटपट होण्यासाठी काही उपयोगी टिप्स... 

१. चपात्यांची कणिक मळताना :- काहीवेळा आपल्याला अगदी २ ते ३ अशा मोजक्याच चपात्या करायच्या असतात. अशावेळी पीठ मळायचा फार कंटाळा येतो. यासाठी आपण एक सोपी ट्रिक वापरु शकतो. यासाठी आपण लसूण सोलण्याचे छोटे यंत्र किंवा मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करु शकता. यासाठी आपल्याला लसूण सोलण्याच्या छोट्या यंत्रात थोडेसे पीठ घेऊन त्यात किंचित पाणी घालूंन हे यंत्र किंवा मिक्सर फिरवून आपण चटकन कणकेचा गोळा बनवू शकता. 

उकडलेले गरम बटाटे सोलण्याची १ सोपी ट्रिक, हात न पोळता साल काढा झटपट...

मिक्सर न वापरता करा हिरवीगार इन्स्टंट हिरवी चटणी, एक आयडिया भन्नाट मिनिटांत चटणी रेडी...

२. कॉफीमग किंवा कपवरील चहा, कॉफीचे डाग काढण्यासाठी :- आपण पाहिले असेल तर बरेचदा वारंवार वापरुन कॉफीमग किंवा कपवर चहा, कॉफीचे डाग पडतात. हे डाग काही केल्या किंवा कितीहीवेळा रगडून धुतले तरी निघत नाहीत. अशावेळी आपण एक सोपी ट्रिक वापरून अतिशय सहजरित्या हे चहा, कॉफीचे हट्टी डाग काढू शकता. यासाठी आपल्याला एखादा जुना टूथब्रश घेऊन त्यावर टूथपेस्ट लावून घ्यायची आहे. याच्या मदतीने आपण कॉफीमग किंवा कपवरील हट्टी डाग घासून काढू शकता. टूथपेस्ट या डागांवर लावल्यानंतर एक तास ते तसेच ठेवावे, एक तासांनंतर पुन्हा एकदा ब्रशने घासून मग डिशवॉश लिक्विडच्या मदतीने स्वच्छ घासून घ्यावेत. या उपायाच्या मदतीने आपण कॉफीमग किंवा कपवरील चहा, कॉफीचे हट्टी डाग सोप्या पद्धतीने काढू शकता. 

स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...

बाथरुममधील शॉवरला गंज चढलाय ? ४ टिप्स - गंज निघेल चटकन आणि शॉवर होईल चकाचक...

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

३. कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता स्टोअर करून ठेवण्यासाठी :- आपण शक्यतो आठवडाभर लागणारे कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता एकदाच विकत आणून ते फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता हे नाशवंत असल्याने ते व्यवस्थित स्टोअर केले नाहीत तर लगेच खराब होतात. असे होऊ नये म्हणून आपण बाजारांत फळांसाठी पॅकिंग केल्या जाणाऱ्या कंटेनरचा वापर करु शकतो. या पॅकेजिंग कंटेनरला लहान - लहान छिद्र असतात ज्यामुळे हवा खेळती राहून आतील पदार्थ दीर्घकाळ टिकतात. यासाठी असे प्लॅस्टिक कंटेनर घेऊन त्यात तळाशी टिश्यू पेपर अंथरून मग आपण यात कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता स्टोअर करून फ्रिजमध्ये ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकतात. टिश्यू पेपर ठेवल्यामुळे ते यातील जास्तीची आर्द्रता शोषून घेतात. यामुळे कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता दीर्घकाळ चांगले टिकून राहतात.

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

Web Title: Cooking Tips and Tricks To Make Everyday Cooking Easy and Hassle Free.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.