Join us  

रोजचं काम सोपं करतील ४ किचन टिप्स; कामाचा वेळ वाचेल-पटापट आवरून होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 1:12 PM

Cooking Tips : तांदूळ आणि दळलेलं पीठ खराब होऊ नये यासाठी तुम्ही स्टोरींग कंटेनरचा वापर करू शकता. डब्याचं झाकण थोडं जरी उघडला  राहीलं तरी किडे लागतात.

पावसाळ्याच्या दिवसात किचनमध्ये साठवलेले अन्नधान्य- खाद्यपदार्थ खराब व्हायला सुरूवात होते. पावसाळ्यात हवेत मॉईश्चर आल्यानं बुरशी लागते आणि अन्नपदार्थ खराब होण्याचा धोका असतो. (Tips And Tricks) तर भाड्ंयानाही जंग लागतो. फळं, भाज्या लवकर खराब होण्याचा धोका असतो. घरात कुबट वासही येऊ लागतो. (Cooking Tips) काही किचन टिप्स तुमचं रोजचं काम सोपं करू शकता. (Home Hacks)

1) अन्नधान्य खराब होऊ नये यासाठी काय करायचे?

तांदूळ आणि दळलेलं पीठ खराब होऊ नये यासाठी तुम्ही स्टोरींग कंटेनरचा वापर करू शकता. डब्याचं झाकण थोडं जरी उघडं  राहीलं तरी किडे लागतात. यापासून वाचण्यासाठी माचिसच्या ५ ते ६ काड्या एकत्र  करून रबर बॅण्डनं बांधा. तांदळाच्या मध्ये हे ठेवून भाडं बंद करा. यामुळे तांदळात किडे लागत नाही. आठवड्यातून एकदा  तांदूळ उन्हात ठेवा. यामुळे तांदळातील बारीक किडे निघून जातील. तुम्ही यात ७ ते ८ लवंगही घालू शकता.

२) चाकूची धार वाढवण्यासाठी उपाय

किचनमध्ये सुरीशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही. सुरीचा वापर करून तुम्ही सर्व भाज्या कापू शकता. पण जर सुरीला गंज लागला असेल तर पटकन कोणताही पदार्थ कापून होत नाही. गंज लागलेला चाकू न वापरता तुम्ही फेकून देऊ शकता.

किचनमधली बारीक झुरळं कमीच होत नाहीत? ३ सोपे उपाय, घरात एकही झुरळ दिसणार नाही

एक कांद्याचा तुकडा घ्या. कांद्याचाा तुकडा  सुरीवर व्यवस्थित घाला. ५ मिनिटं घासा. मग सुरी साबण आणि पाण्यानं स्वच्छ धुवून  सुकवून वापरा. कांद्याच्या तुकड्यांचा वापर तुम्ही इतर भांड्यांवरचा गंज घालवण्यासाठीही करू शकता. लोखंडाचा तवा आणि कढई स्वच्छ केल्यानंतर तेलानं ग्रीस करा. यामुळे भांड्यात गंज लागणार नाही.

पिग्मेंटेशन वाढलंय, चेहरा डल दिसतोय? 2 घरगुती उपाय, डाग कायमचे जातील, ग्लोईंग दिसेल त्वचा

३) टोमॅटो खराब होणार नाही

पावसाळ्याच्या दिवसात टोमॅटोचे भाव गगनाला भिडतात. कारण जास्त पावसामुळे अनेकदा पिकांचं नुकसान होतं. अशात टोमॅटो आणि इतर भाज्यांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. टोमॅटो सडू नयेत म्हणून तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून ठेवा. नंतर  देठ काढून टाका. एक मेणबत्ती लावून मेणाचे २ थेंब टोमॅटो स्टेमवर लावा. यामुळे वरची जागा सील होईल आणि टोमॅटो खराब होणार नाहीत. नंतर यावरचं मेण काढून तुम्ही  टोमॅटो वापरू शकता.

४) किचनमधून दुर्गंधी येत असेल तर हा उपाय करा

पावसाच्या दिवसात स्वंयपाकघरातून दुर्गंध येत असेल तर  माश्यांना पळवून लावण्यासाठी आणि दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही अगरबत्तीमध्ये बेगॉन स्पे घालून जाळू शकता आणि हे किचन  सिंकजवळ ठेवा. लिंबू अर्धा कापून  ३ ते ४ लवंग त्यात घालून किचन सिंक जवळ ठेवल्यास दुर्गंधी येणार नाही.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स