Join us

फोटो चांगला येतच नाही? ५ भन्नाट ट्रिक्स.. एडिट न करताही फोटोमध्ये दिसाल सुंदर- आकर्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 14:14 IST

Ideas For Clicking Nice Photos: बऱ्याच जणांचं हे दुखणं असतं की आमचे फोटो काही चांगले येतच नाहीत. मग ते सेल्फी असो की कुणी दुसऱ्याने काढलेले. म्हणूनच फोटो काढताना लक्षात ठेवा या काही मस्त ट्रिक्स.

ठळक मुद्देफोटो किंवा सेल्फी काढताना या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा. फोटो अधिक सुंदर- आकर्षक येण्यास मदत होऊ शकते. 

फोटोच नाही काढला तर सेलिब्रेशन पुर्ण कसं होणार? बरं सेलिब्रेशन असेल तरच फोटो काढायचा, असं पुर्वीसारखं कुठे राहिलंय आता.. आता तर सोशल मिडिया साईट्स किंवा व्हॉट्सॲप यावरचे प्रोफाईल पिक्चर, डीपी बदलायलाही वेगवेगळे फोटो पाहिजेच असतात ना. स्टेटसला ठेवायलाही छान फोटो सारखे लागतातच. काही जण अगदी सहज सुंदर फोटो काढतात. पण काही जणांचे मात्र फोटो चांगले येतच नाहीत, असं त्यांचं दु:ख असतं. तुम्हीही त्यातलेच असाल तर फोटो किंवा सेल्फी काढताना या काही टिप्स आणि ट्रिक्स (Tips and tricks for attractive photos) वापरून बघा. फोटो अधिक सुंदर- आकर्षक येण्यास मदत होऊ शकते. 

 

आकर्षक फोटो काढण्याच्या भन्नाट ट्रिक्सहे सगळे उपाय 5-Minute Crafts Play या फेसबूक पेजवर शेअर करण्यात आले आहेत. अनेक जणांना वेगवेगळ्या पोझमधले फोटो काढायला आवडतात. पण नेमकी कशी पोझ द्यावी हे समजत नाही. याबाबतदेखील अनेक टिप्स या व्हिडिओमध्ये देण्यात आल्या आहेत.१. आपल्या फोनच्या कॅमेऱ्यासमोर पिवळी, गुलाबी, केशरी अशा वेगवेगळ्या रंगाच्या स्केल किंवा ट्रान्सफरंट कागद धरा आणि मग फोटो काढा. इफेक्ट्स न देताही वेगवेगळ्या शेडमधले फोटो काढता येतील.

इंग्लिश- विंग्लिश सिनेमात श्रीदेवीने नेसलेल्या सुंदर साड्यांचा होणार लिलाव, दिग्दर्शक गौरी शिंदेंची घोषणा 

२. डिपी किंवा प्रोफाईल पिक्चर म्हणून एखादा छानसा फोटो पाहिजे असेल तर थोडं उन्हात उभं रहा. एखादं जाळीदार टोपलं तुमच्या हातात घ्या. चेहऱ्याच्या आजूबाजूला अशा पद्धतीने ठेवा की टोपल्याच्या जाळीतून तुमच्या चेहऱ्यावर थोडी सावली येईल. थोडं ऊन आणि थोडी सावली यांचं कॉम्बिनेशन असलेला हा फोटो मस्त दिसेल.

 

३. पाणी भरलेल्या भांड्याजवळ, आरशाजवळ किंवा हातात पाण्याची बॉटल घेऊन उन्हात उभं रहा. पाण्याचं किंवा आरशाचं रिफ्लेक्शन चेहऱ्यावर पडेल आणि छान फोटो काढता येईल.

फक्त १० मिनिटांचा १ व्यायाम! मांड्या आणि पोटावरची चरबी होईल महिनाभरात कमी..

४. तुमचा ब्लॅक शॅडोसारखा फोटो घ्यायचा असेल तर एका खोलीत अंधार करा. मोबाईल हाताच्या दंडावर रबरबॅण्डने लावून टाका. त्याचा फ्लॅश लाईट सुरू करा आणि तो भिंतीवर पडेल अशा पद्धतीने उभे रहा. दुसऱ्या बाजुने कुणाला तरी फोटो काढायला सांगा. भिंतीवर तुमची मोठी सावली, त्यानंतर तुम्ही, असा छान फोटो येईल. 

५. स्वत:च स्वत:चा उडी मारतानाच फोटो काढायचा असेल तर खालच्या पायरीवर मोबाईलवर ठेवा आणि एक पाय पुढे घेऊन टायमर सेट करून फोटो काढा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसेल्फी