हिवाळा असो किंवा पावसाळा खाद्यप्रेमी कोणत्याही ऋतूत भजी (Kothimbir Bhaji) खाण्यास नकार देत नाही. भजी अनेक प्रकारची केली जाते. बटाटा, कांदा, कोबी यासह पालक आणि कोथिंबीरीची भजी देखील आवडीने खाल्ली जाते. काही जण कोथिंबीर वडी तयार करतात, तर काही जण न उकडता कोथिंबीर चिरून त्याची भजी तयार करतात. दोन्ही प्रकार खायला चविष्ट आणि कुरकुरीत लागतात. पण सध्या एका रस्त्यावरील विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात त्याने कोथिंबीरीची भजी तयार करताना, कोथिंबीर चिरून न घेता तशीच अख्खी वापरली आहे.
आपण अनेकदा कोथिंबीर निवडून, स्वच्छ धुवून आणि मग चिरून तिचा वापर करतो. पण या व्हिडिओमधील एका पठ्ठ्याने कोथिंबीरीच्या २ ते ४ कुड्या एकत्र पकडून थेट बेसनात बुडवून, तेलात सोडून भजी तळली आहे (Cooking Tips). सध्या या रेसिपीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून (Social Viral), अनेकांनी कमेंट करत या रेसिपीला ट्रोल केलं आहे(Coriander leaves Pakora, check out viral kothimbir bhaji video, netizens troll this video).
२ टोमॅटो-कपभर तांदूळ, पाहा चटपटीत पण पौष्टीक डोशाची सोपी कृती, न आंबवता डोसा होईल काही मिनिटात रेडी
कोथिंबीरीची हटके भजी सोशल मीडियात व्हायरल
सध्या कोथिंबीर भजीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आवडीने भजी खाणारेही लोकं नाकं मुरडत आहे. शिवाय स्वच्छतेबाबत प्रश्नही निर्माण करत आहे. विशेषतः भजी ज्या तेलात तळल्या आहेत, त्या तेलाबद्दलही लोकं शंका निर्माण करत आहे. कारण हे तेल काळपट दिसत असून, याचा वापर बऱ्याच वेळा केला असल्याचं दिसून येत आहे.
रेसिपीला केलं नेटकऱ्यांनी ट्रोल
२ कप ज्वारीचा करा कुरकुरीत पौष्टीक डोसा, ग्लुटेन फ्री रेसिपी वेट लॉससाठी उत्तम-चवीला जबरदस्त
सोशल मीडियात या व्हिडओवर अनेकांनी टिकेचे झोड उठवले आहे. एकाने कमेंट करत, 'जेव्हा उकेतील काही लोकं भारतात शिरले, तेव्हापासून या तेलाला बदलले नाही,' तर दुसऱ्याने, 'आता तेल बदलण्याची वेळ आली आहे.' तर, एकाने कमेंटमध्ये लिहिले होते की, 'भाऊ, तुम्ही किमान कोथिंबीर तरी धुवून घ्यायला हवी होती.' तर एका महिलेने, 'एका प्लेटमध्ये किती हार्ट अॅटॅक सर्व्ह होतील?.' सध्या या रेसिपीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, अनेकांनी कमेंट करत या व्हिडिओला ट्रोल केलं आहे.