Lokmat Sakhi >Social Viral > कॉफी विथ करणमध्ये आलिया भटने घातलेल्या सव्वा लाखांच्या ड्रेसची खासियत, तुम्ही म्हणाल त्यात इतकं काय आहे...

कॉफी विथ करणमध्ये आलिया भटने घातलेल्या सव्वा लाखांच्या ड्रेसची खासियत, तुम्ही म्हणाल त्यात इतकं काय आहे...

Cost of Alia Bhat Dress in Coffee with Karan : कोणत्याही कपडयात स्वत:ला छान कॅरी करणारी आलिया चाहत्यांच्या मनावर कायमच राज करते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 10:08 AM2022-07-09T10:08:40+5:302022-07-09T10:10:02+5:30

Cost of Alia Bhat Dress in Coffee with Karan : कोणत्याही कपडयात स्वत:ला छान कॅरी करणारी आलिया चाहत्यांच्या मनावर कायमच राज करते

Cost of Alia Bhat Dress in Coffee with Karan : The specialty of Alia Bhatt's dress worth Rs. 1.25 lakhs | कॉफी विथ करणमध्ये आलिया भटने घातलेल्या सव्वा लाखांच्या ड्रेसची खासियत, तुम्ही म्हणाल त्यात इतकं काय आहे...

कॉफी विथ करणमध्ये आलिया भटने घातलेल्या सव्वा लाखांच्या ड्रेसची खासियत, तुम्ही म्हणाल त्यात इतकं काय आहे...

Highlightsया ड्रेसमध्ये फार काही विशेष नसले तरी त्यामध्ये आलिया अतिशय उठून दिसत होती हे नक्कीब्रॅंडेड असल्याने या ड्रेसची किंमत खू जास्त असावी

लवकरच आई होणार असलेली अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर दोन महिन्यातच आलिया आणि रणबीरने आपल्याकडे गुडन्यूज असल्याचे सांगितले आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. (Bollywood Actress Dressing Style) आलिया तिच्या भूमिका निवडण्याबाबत जितकी काटेकोर असते तितकीच ती तिच्या फॅशन सेन्सबाबतही निवडक असते. वेस्टर्न कपडे असो वा पारंपरिक साडी किंवा लेहंगा आलिया तितक्याच शानदारपणे हे कपडे कॅरी करते (Cost of Alia Bhat Dress). त्यामुळे तिच्यावर कोणत्याही प्रकारचे कपडे अतिशय उठून दिसतात. बारीक चण, डोळ्यात असलेली चमक आणि तिचा आत्मविश्वास यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात आणखीच भर पडते (Coffee with Karan). 

(Image : Google)
(Image : Google)

नुकतेच आलियाचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे फोटो स्वत: आलियानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. कॉफी विथ करन ७ या शोमध्ये आलियाने गुलाबी रंगाचा एक छानसा शॉर्ट वनपीस घातला होता. अतिशय आगळीवेगळी फॅशन असलेला या वनपीसमध्ये फारसा मेकअप न करता किंवा ज्वेलरी न घालताही ती सुंदर दिसत होती. Magda Butrym ब्रॅंडच्या या ड्रेसची किंमत थोडीथोडकी नसून तब्बल १५५५ डॉलर म्हणजेच रुपयांमध्ये १,२२,७६८ इतकी आहे. तर या ड्रेसवर काही प्रमाणात डिस्काऊंट देण्यात आल्यानंतर तो ८५,८९८ रुपयांना आहे.  


गुलाबी रंगावर लाल रंगाच्या पाकळ्या असलेल्या या वनपीसची स्टाईल एकदम हटके होती. नेकला डीप कट, फुल बाह्या, डाव्या खांद्यावर मोठी फ्रिल आणि छातीच्या इथे बो सालखी डिझाईन आणि खाली पोटापाशीही एक पिळ दिलेली फॅशन करण्यात आली होती. आलियाने या ड्रेसवर अतिशय साधासा मेकअप केला होता. मात्र तिच्या हातातील एंगेजमेंट रींग तिच्या फोटोंमध्ये उठून दिसत होती. पोटापासून खाली आडव्या प्लेटस देण्यात आल्याने या ड्रेसच्या फॅशनमध्ये आणखीनच भर पडत होती. या ड्रेसमध्ये फार काही विशेष नसले तरी त्यामध्ये आलिया अतिशय उठून दिसत होती हे नक्की. आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाईललाही याच ड्रेसमधील फोटो ठेवला आहे. 

Web Title: Cost of Alia Bhat Dress in Coffee with Karan : The specialty of Alia Bhatt's dress worth Rs. 1.25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.