लोकं छंदासाठी काय काय करतील सांगता येत नाही. मात्र, काही लोकांचे छंद हे जगावेगळे असतात. ज्यामुळे त्यांना जगात एक नवी ओळख मिळते. याच लोकांची दखल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स घेते. आणि त्यांना जगभरात एक नवीन ओळख मिळवून देते. असच एक जोडपं आहे. जे आपल्या हटक्या छंदामुळे चर्चेत आलं आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवून एक नवा विक्रम रचला आहे. या जोडप्याने आपल्या शरीरावर शस्त्रक्रिया करून वेगवेगळे बदल तर केले आहेच. यासह त्यांनी आपल्या आयुष्यातील गेली 24 वर्षे बॉडी मॉडिफिकेशन करण्यात घालवलं आहे. त्यांनी आपल्या शरीरात ९८ बदल करत विश्वविक्रम रचला आहे.
गॅब्रिएला आणि व्हिक्टर असे त्या जोडप्याचं नाव आहे. त्यांची भेट अर्जेंटिना येथील एका मोटार सायकल कार्यक्रमात घडली, पहिल्याच नजरेत ते एकमेकांच्या प्रेमात बुडाले. आणि पुढे त्याचं आयुष्याच बदललं. त्यांनी एकमेकांसह लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. हे जोडपं आपलं आयुष्य इतर जोडप्यांपेक्षा हटके पद्धतीने जगतात.
या जोडप्याला टॅटूची प्रचंड आवड. त्यांनी आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवले आहेत. डोळे आणि जीभेवरही त्यांनी टॅटू गोंदवले आहेत. व्हिक्टरने बॉडी मॉडिफिकेशन करत त्यांची जीभेचे दोन भाग केले आहेत, शिवाय कानाचा आकारही बदलला आहे. गॅब्रिएलानेही संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवले आहेत. व्हिक्टरने पहिलं बॉडी मॉडीफिकेशन 2009 साली केलं होतं. असे करत करत त्याने संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवून घेतलं आहे.
या वेगळ्या छंदासंदर्भात विचारण्यात आले असता व्हिक्टरने सांगितले की, ''माझी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली यासाठी मी खूप आभारी आहे. माझा आवडता छंद आणि कलेची नोंद घेतली यातच मी खुश आहे. या विक्रमामुळे माझं एक स्वप्न पूर्ण करण्यास मदत झाली. आमच्या दोघांची आवड एकच असल्यामुळे आमचं वैवाहिक आयुष्य देखील खूप सुखी आहे.''