Join us  

'मी सिंगलच बरा आहे..' गर्लफ्रेंडबरोबर बाईक राईड भावाला चांगलीच महागात पडली, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:34 AM

Couple Funny Video went viral : . हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स म्हणाले, मृत्यू आला तरी चालेल पण अशी गर्लफ्रेंड नको...

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओज पाहून नेटिझन्स आश्चर्यचकीत होतात तर काही व्हिडिओ भरपूर हसवतात.  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला कपल्सचा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसणं कंट्रोल होणार नाही.  या व्हिडिओनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स म्हणाले, मृत्यू आला तरी चालेल पण अशी गर्लफ्रेंड नको... (Couple funny video went viral on social media netizens says i am single fine)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एका तरूणाच्या मागे त्याची गर्लफ्रेंड बसली आहे.  ती ब्लॉग बनवण्यात व्यस्त असल्याचं  दिसून येईल. यादरम्यान ती बॉयफ्रेंडला काही सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्याला सतत व्हिडिओमध्ये पाहण्यास सांगते.  बाईक चालवण्याकडे लक्ष असल्यानं त्याला मोबाईलमध्ये  पाहायला जमत नाही.

होणाऱ्या नवऱ्याला बघायला ती बाल्कनीमध्ये गेली, नंतर जे घडलं पाहून पोट धरून हसाल

गर्लफ्रेंडच्या वारंवार सांगण्यावरून तो मागे बघतो आणि पुढच्या क्षणाला जे घडतं ते पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. मोबाईलमध्ये बघण्याच्या नादात  ते दोघंजण बाईकवरून आपटतात. या दोघांना कितपत दुखापत झाली याबाबत खुलासा झालेला नाही.  हे दृश्य पाहून वाहन चालवत असताना फोनचा वापर करणं किती महागात पडू शकतं हे दिसून येतं. 

जगात कुठे हिंडा पण..' साफसफाईनंतरचा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या....

हा विनोदी व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर memecentral.backup अकाऊंटच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, अरे दिदी..... आतापर्यंत या व्हिडिओला १२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या रिएक्शन्स देतं आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया