आसाममधील एका जोडप्याचे लग्न आणि त्यांनी लिहून घेतलेल्या आणाभाका, कॉण्ट्रॅक्टवर कराव्या तशा वऱ्हाडींच्या साक्षीनं केलेल्या सह्या हे सारं गेले ३-४ दिवस सोशल मीडियात चांगलंच व्हायरल आहे. काय आजकालची एकेक खुळं म्हणून त्याकडे कानाडोळा करता येईलच. मात्र अनेकांना त्यात गंमत वाटली कारण त्यांनी जोडप्यात हमखास भांडणं लावणाऱ्या कारणांचाच तह केला होता. (Couple Signs Contract Goes Viral) मात्र त्यातली एक अट नेमकी कुणी घातली कुणी मान्य केली हे कळत नसल्यानं सोशल मीडियात बरीच चर्चा रंगली. ती म्हणजे मी रोज साडीच नेसेन असं त्या वधूनं कबूल केलं आहे. अनेकांचं म्हणणं आहे की ते तिनं स्वच्छेनं केलं की तिला ती अट मान्यच करावी लागली. कपडे घालण्याचं स्वातंत्र्य देशात प्रत्येकाला आहे, त्या मुलीला लग्नानंतर आपण साडीच नेसावी असं वाटत असेल तर त्यात काही गैर नाहीच. पण लग्नानंतर मुलींनी साडीच नेसली पाहिजे ही सक्ती तर त्यात नाही? किंवा तसा मेसेज तर जात नाही? (Assam couple signs contract saying bride has to wear saree everyday. Viral video divides Internet)
शांती आणि मिंटू नावाचे हे जोडपे . ते आठ अटींच्या लग्नाच्या करारावर स्वाक्षरी करताना व्हायरल व्हिडिओत दिसते. वेडलॉक फोटोग्राफीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ. १. महिन्यातून एकदाच पिझ्झा खावा. २. घरच्या जेवणाला नेहेमी होच म्हणावं लागेल. २. रोज मी साडीच नेसेन. ४. नवरा लेट नाइट पार्टी करु शकतो पण ती फक्त माझ्यासोबतच. ५. रोज जिमला जाणं आवश्यक आहे. ६. रविवारचा नाश्ता नवऱ्याला तयार करावा लागेल. ७. कोणत्याही पार्टीला गेल्यावर माझा चांगला फोटो काढणं मस्ट आहे. ८. दर १५ दिवसांनी शाॅपिंगला घेऊन जावं लागेल.वरवर या मागण्या अतिशय विनोदी, किंवा ज्यामुळे भांडणं होतात. कुणी कुणाचं ऐकायचं असे वाद होतात त्यासंदर्भात आहे हे दिसते. त्यांनी सहज विनोद किंवा काहीतरी वेगळे म्हणूनही हे केलं असावं. मात्र व्हायरल पोस्टनंतर मात्र अनेक नेटकऱ्यांना प्रश्न पडला की, रोज साडीच नेसणार ही अट त्या मुलीनं का मान्य केली असेल? तिची इच्छा की बळजबरी? कामाचे व्याप, धावपळ, नोकऱ्या, पुढे मुलंबाळं यासाऱ्यात साडी नेसणं अनेकींना जिकीरीचं होतं. पंजाबी ड्रेस सुटसुटीत वाटतात पण ही मुलगी हे अजबच कसं कबूल करुन बसली. यातला मुळ प्रश्न आहे, ज्यांना रोज साडी नेसणं सोयीचं वाटत नाही, तसा सराव नाही त्यांना ही अट अजब वाटली.काहींना वाटलं साडी नेसणं हे आवडीचा भाग किंवा परंपरेचा भाग आहे, त्यात काय मोठंसं?
लेकाच्या हट्टामुळे आईनं स्वयंपाक करताना गाणं गायलं; माऊलीच्या जबरदस्त आवाजानं लोकांना वेड लावलं
जसं काही महिलानं ती अट आवडली नाही. तसं अनेक पुरुषांनाही लेट नाइट पार्टी बायकोसोबतच करायची ही अट आवडली नाही.नवऱ्याला मित्र असतात, त्यांच्यासोबत जाणं पार्टी करणं लग्न झाल्यानंतर बंद का करायचं असा काहींचा सवाल आहे.तर काहींचा प्रतीप्रश्न आहे की, बायकोनंही लेट नाइट पार्टी करणं त्याला चालणार असेल तर ही अट रास्त आहे.एका जोडप्याचा खासगी लग्न करार व्हायरलने जगजाहीर केला मात्र त्यामुळे आपल्या समाजात आजही असलेले स्त्री-पुरुष भेद, अपेक्षा आणि समज-गैरसमजही त्यातून अधोरेखित झाले.अगदी स्वत:ला मॉडर्न समजणाऱ्या इन्स्टा जगातही अटी शर्थींचा विनोद होताना त्यातला विरोधाभास ठळक होत गेला.