प्रेमात माणूस काहीही करू शकतो आपण हे वाक्य ऐकलंच असेल. प्रेम आंधळं असतं, प्रेमाची ताकद एवढी असते की, ती त्या व्यक्तीला काहीही करण्यास बळ देते. प्रेमात असलेला माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. परंतु, इतरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार आपल्याला नसतो हे विसरता कामा नये. सध्या प्रेमाच्या नशेत धुत एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यात एक जोडपं बाईकवरून जात आहे.
बररं, तुम्ही म्हणाल यात काय नवीन ? मात्र, या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे यात तरुणी तरुणाच्या मागे नसून, त्याच्या समोर म्हणजेच गाडीच्या टाकीवर तरुणाला मिठी मारून बसली आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला देखील फिल्मी वाटेल. पाहा व्हायरल व्हिडिओ..
Video of bike rider goes viral..As at busy Thane bhiwandi highway. he is riding bike sitting a girl on bike tank ..@ThaneCityPolice@MumbaiPolice@MumbaiRTOpic.twitter.com/oRL2Fe7WH6
— EXPRESS NEWS HINDI (@expressnews4u) December 22, 2022
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी मागे बसण्याऐवजी दुचाकीस्वाराच्या समोर बसलेली आहे. व ही दुचाकी हायवेवर धावणाऱ्या इतर वाहनांना ओव्हरटेक करत पुढे जात आहे. पाठीमागून धावणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या तरुणाने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. जो प्रचंड चर्चेत आला आहे.
आपण या व्हिडिओत पाहू शकता की, शूट होत असल्याचे पाहून स्टंट करणारा दुचाकीस्वार थांबतो आणि व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला धमकावतो. यावर दुचाकीस्वार आणि तरुणीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून या जोडप्याचं प्रेम नव्हे तर मूर्खपणाच दिसून येत असल्याचं अनेकांनी म्हंटल आहे. सध्या हा अतरंगी व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.