गोलगप्पे म्हणजेच पाणीपुरी फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही खूप आवडते. नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून याचा अंदाज येतो, ज्यात रस्त्यावर फिरणारी एक गाय आणि तिचं वासरू गोलगप्पा खात आहेत. (Cow and Calf Eat Gol Gappe) एवढ्या चवीने गोलगप्पा खाताना प्राणी तुम्ही क्वचितच पाहिले असेल. हा व्हिडीओ जुना आहे, पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Watch cow and calf eat gol gappe pani puri in uttar lucknow pradesh)
गोल गप्पा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात, जसे की- पाणीपुरी, बताशा, पुचका, फुलकी, गुपचूप इ. पाणीपुरीचे नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, मात्र नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाणीपुरीची चव माणसंच नाही तर गाईसुद्धा घेताना दिसत आहे.
मां-बेटी साथ हों और गोलगप्पे की दुकान हो..
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) September 25, 2022
फिर कहना ही क्या 💕#MotherDaughter#Respectfully#beautifulpic.twitter.com/KnLjiR1lfs
हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मनोरंजक व्हिडिओमध्ये एक माणूस गाय आणि तिच्या वासराला गोलगप्पा खाऊ घालताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आई-मुल दोघंही पाणीपुरीच्या नंबरची वाट पाहत आहेत.
हा व्हिडिओ झारखंडचे जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
भयंकर! पोटात दुखत होतं म्हणून दवाखाना गाठला; डॉक्टरांनी पोटातून काढले तबब्ल ६३ चमचे
व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जर आई आणि मुलगी एकत्र असतील आणि त्यांना गोलगप्पा विकणारा सापडला तर आणखी काय सांगता येईल.' लोक व्हिडिओ पाहत आहेत, शेअर करत आहेत आणि कमेंट करत आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत.