दैनंदिन जीवनात आपल्याकडून प्लास्टिकचा वापर होतोच. त्यात प्लास्टिकची बाटलीही आलीच. अनेकदा प्लास्टिक बॉटल खराब होते, किंवा आपण त्याचा वापर करणे टाळतो. काही लोकं प्लास्टिकच्या बाटलीचा वापर विविध गोष्टींसाठी करतात. परंतु, बाटलीच्या कॅपचा वापर कुठे होतो का?
प्लास्टिकच्या बाटल्यांमधून कोल्ड्रिंक्स, पाणी, कॉफी अशा विविध प्रकारचे लिक्विड पदार्थ देण्यात येते. या गोष्टी प्यायल्यानंतर आपण बॉटल फेकून देतो. परंतु, प्लास्टिक बॉटल कॅपचा वापर आपण विविध गोष्टींसाठी नक्कीच करू शकता. आता तुम्ही म्हणाल छोट्या - छोट्या कॅपचा वापर कसा आणि कुठे होईल? आपल्याही घरात प्लास्टिक बाटलीच्या कॅप्स पडून असतील तर, यापासून ३ वस्तू करून पाहा(Creative ways to reuse plastic bottle caps).
डीआयवाय बॉटल कॅप्स क्राफ्ट
आपल्या घरातील भिंत रिकामी दिसत असेल तर, त्यावर डीआयवाय बॉटल क्राफ्ट लावून सजवा. पेटिंगच्या मदतीने आपण बॉटल कॅप्स रंगवू शकता. त्या झाकणांवर आपण छोटे फुले, डिझाईन तयार करू शकता. व कॅप्सला एकत्र चिकटपट्टी किवा ग्लूने चिटकवून सुंदर आकार देऊ शकता.
प्रेशर कुकर वापरताना विसरु नका ४ गोष्टी, चुकलं तर होईल कुकरचा स्फोट-जीवाला धोका
बॉटल कॅप्स वॉल हॅगिंग
आपण बॉटल कॅप्सचा वापर करून वॉल हॅगिंग तयार करू शकता. वॉल हँगिंग बनवण्यासाठी आपण विविध प्रकारच्या बॉटल कॅप्सचा वापर करू शकता. वॉल हॅगिंग तयार करण्यासाठी एक पुठ्ठा घ्या. व विविध रंगाच्या धाग्यांना जुळवून रस्शी तयार करा. आता बॉटल कॅप्सवर एक छिद्र पाडा. व त्यामधून थ्रेड बाहेर काढून, पुठ्ठ्यावर एका बाजूने चिकटवा. आपण ही वॉल हॅगिंग कोणत्याही भिंतीवर चिटकवू शकता.
बॉटल कॅप्सचा वापर करून तयार करा इअररिंग्स
हल्ली सगळ्यांना फंकी गोष्टी घालायला आवडतात. आपण बॉटल कॅप्सचा वापर करून हटके इअररिंग्स तयार करू शकता. इअररिंग्सला हटके लूक देण्यासाठी त्यावर विविध रंग लावून सजवा.