Lokmat Sakhi >Social Viral > हार्दिक पंड्याचं फिटनेस सिक्रेट, घरी तयार केलेली सात्विक, पौष्टिक खिचडी! पहा खास पौष्टिक डाएट..

हार्दिक पंड्याचं फिटनेस सिक्रेट, घरी तयार केलेली सात्विक, पौष्टिक खिचडी! पहा खास पौष्टिक डाएट..

Hardik Pandya's Favorite Food Moong dal Khichadi: खेळाच्या निमित्ताने क्रिकेटर हार्दिक पंड्या ज्या ज्या देशांत जातो, तिथे तिथे त्याच्यासाठी तयार होते पारंपरिक घरगुती मुगडाळीची खिचडी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 02:27 PM2022-11-10T14:27:59+5:302022-11-10T14:28:56+5:30

Hardik Pandya's Favorite Food Moong dal Khichadi: खेळाच्या निमित्ताने क्रिकेटर हार्दिक पंड्या ज्या ज्या देशांत जातो, तिथे तिथे त्याच्यासाठी तयार होते पारंपरिक घरगुती मुगडाळीची खिचडी.

Cricketer Hardik Pandya's fitness and health secret is Moong dal Khichadi, Read his diet plan | हार्दिक पंड्याचं फिटनेस सिक्रेट, घरी तयार केलेली सात्विक, पौष्टिक खिचडी! पहा खास पौष्टिक डाएट..

हार्दिक पंड्याचं फिटनेस सिक्रेट, घरी तयार केलेली सात्विक, पौष्टिक खिचडी! पहा खास पौष्टिक डाएट..

Highlights क्रिकेटच्या दौऱ्यादरम्यान तो जिथे जातो, तिथे त्याच्यासोबत त्याचा पर्सनल शेफ आरव नांगियाही असतो. आरव त्याच्या फिटनेसची काळजी घेतो. 

खिचडी हा भारतीय लोकांचा एक आवडीचा पदार्थ. मुगाची डाळ आणि तांदूळ हे दोन यातले महत्त्वाचे घटक. बाकी तुम्ही  तुमच्या आवडीच्या भाज्या टाका अथवा टाकू नका.. खिचडीची चव आणि आस्वाद मात्र कायम असतो. रात्रीचं जेवण म्हणून  अनेक भारतीय घरांमध्ये आठवड्यातून एक- दोन वेळा तरी हमखास खिचडी केलीच जाते. हीच आपली पारंपरिक खिचडी ( Moong dal Khichadi) क्रिकेटर हार्दिक पंड्या (Cricketer Hardik Pandya) यांचं आवडतं जेवणं असून त्याच्या डाएट प्लॅनमध्ये तर फिटनेसच्या दृष्टीने खिचडी हा एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ मानला गेला आहे.

 

डाएट करायचं म्हणजे नेहमीच काहीतरी वेगळं, ज्याची नावं आपल्याला सहजासहजी माहिती नसतात, असे पदार्थ खायचे, असा एक गैरसमज हळूहळू पसरत चालला आहे. त्यामुळे सहसा आपल्या प्रांतात न आढळणारे किंवा काहीतरी इंग्रजी नावं असणारे पदार्थ खाण्याकडे डाएट फ्रिक लोकांचा कल असतो.

'तब्येतीच्या अनेक समस्यांनी मलाही छळलेय पण तरी मी...", भाग्यश्री सांगतेय पाठदुखी छळते तेव्हा...

पण आपले पारंपरिक पदार्थ खाऊनही फिटनेस कसा जपता येतो, हे हार्दिक पंड्या यांने इंडियन एक्सप्रेसला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. क्रिकेटच्या दौऱ्यादरम्यान तो जिथे जातो, तिथे त्याच्यासोबत त्याचा पर्सनल शेफ आरव नांगियाही असतो. आरव त्याच्या फिटनेसची काळजी घेतो. 

 

याविषयी सांगताना हार्दिक म्हणतो की भारतीय संघासोबत त्यांचा शेफ नसतो. पण एक खेळाडू म्हणून मला असे वाटते की मला माझा फिटनेस जपणे आवश्यक आहे. त्यसाठी शेफचा खर्च ही थोडी जास्तीची किंमत मोजण्याचीही माझी तयारी आहे.

हिवाळ्यात फिट राहण्यासाठी पुजा माखिजा सांगतात खास सॅलेड, रेसिपी आणि खास डाएट मंत्र..

हा शेफ नेहमीच त्याच्या सोबत असतो आणि त्याच्या गरजेनुसार त्याला पारंपरिक पौष्टिक पदार्थ करून देतो. अगदी मोजके मसाले टाकून हे पदार्थ घरगुती पद्धतीने केले जातात आणि अर्थातच या पदार्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे मुगडाळीची खिचडी. 
 

Web Title: Cricketer Hardik Pandya's fitness and health secret is Moong dal Khichadi, Read his diet plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.