सोशल मिडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल, हे काहीच सांगता येत नाही. त्यातल्या त्यात सेलिब्रिटींच्या बाबतीत असणाऱ्या पोस्ट तर नेहमीच चर्चेत असतात. आता अशाच एका पोस्टच्या निमित्ताने क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी (Cricketer Mahendra Singh Dhoni) याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Singh's school report card is viral) सध्या चर्चेत आहे. तिच्या प्रगती पुस्तकाचे फोटो तिने सोशल मिडियावर नुकतेच शेअर केले असून अवघ्या काही तासांतच ते जबरदस्त व्हायरल झाले आहेत.
महेंद्रसिंग धोनीचे करिअर, त्याचा क्रिकेटचा प्रवास या गोष्टींची जेवढी चर्चा असते, तेवढीच चर्चा त्याच्या आणि साक्षीच्या लव्हस्टोरीची पण होत असते. साक्षी सोशल मिडियावरही बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असते.
ऑफिसमध्ये बसल्या- बसल्याच करता येतील असे ५ मिनिटांचे ५ व्यायाम, ताण होईल कमी- व्हाल रिलॅक्स
आता नुकतीच तिच्या प्रगती पुस्तकाची पोस्टही गाजते आहे. यामध्ये साक्षीने प्रगती पुस्तकाच्या फक्त पहिल्या पानाचा फोटो शेअर केला आहे. त्यावेळी ती दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. दुसरीमध्ये असताना तिला किती गुण मिळाले, हे मात्र तिने मोठ्या खुबीनेच गुलदस्त्यात ठेवले आहे. नेमकं तेच तर बघण्याची नेटिझन्समध्ये उत्सूकता होती.
"Found my report card and realised my daughter is in the same grade. Whats written inside is highly confidential and certainly not out of Archie Comics!",अशी मजेशीर कॅप्शनही तिने या फोटोंना दिली आहे.
थंडीच्या दिवसांत स्वेटरला हटके पर्याय, शाल कॅरी करण्याची एक खास पद्धत.. दिसा फॅशनेबल
म्हणूनच तर तो फोटो पाहून अनेकांनी तिला प्रगती पुस्तकाच्या आतल्या पानाचाही फोटो शेअर करावा असं सुचवलं आहे. काही जणांनी तर महेंद्रसिंग धोनीचं प्रगती पुस्तक देखील शेअर कर, अशा सूचना दिल्या आहेत. तिच्या शाळेतल्या काही वर्गमित्रांनी मात्र हा फोटो पाहून शालेय जीवनातल्या जुन्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा दिला.