Lokmat Sakhi >Social Viral > ७० वर्षांच्या आजोबांच्या हातचे मोमोज खायला मुंबईकर करतात गर्दी, पाहा व्हायरल व्हिडिओ

७० वर्षांच्या आजोबांच्या हातचे मोमोज खायला मुंबईकर करतात गर्दी, पाहा व्हायरल व्हिडिओ

मुंबईमध्ये मोमोजचा एक स्टॉल असाच प्रसिद्ध आहे. आता तो प्रसिद्ध असण्याचे कारण आहे ते म्हणजे हा स्टॉल चालविणारा व्यक्ती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 11:13 AM2022-03-15T11:13:56+5:302022-03-15T11:23:28+5:30

मुंबईमध्ये मोमोजचा एक स्टॉल असाच प्रसिद्ध आहे. आता तो प्रसिद्ध असण्याचे कारण आहे ते म्हणजे हा स्टॉल चालविणारा व्यक्ती.

Crowds of Mumbaikars eat momos from 70-year-old grandfather's hand, watch the viral video | ७० वर्षांच्या आजोबांच्या हातचे मोमोज खायला मुंबईकर करतात गर्दी, पाहा व्हायरल व्हिडिओ

७० वर्षांच्या आजोबांच्या हातचे मोमोज खायला मुंबईकर करतात गर्दी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Highlightsया वयातही त्यांची असलेली चिकाटी आणि काम करण्याची ताकद अनेकांसाठी प्रेरणा ठरणारीच आहे.  त्यांचा हात काहीसा थरथरतानाही दिसतो. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरुन ते कुठेही थकलेले किंवा वैतागलेले वाटत नाहीत.

मोमोज हा आपल्यातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ. भाज्या असल्याने तसेच वाफवलेले असल्याने यामध्ये आरोग्याला हानिकारक असे जास्त काही नसते. पोटभरीचा आणि तरीही चटपटीत म्हणून भुकेच्या वेळी मोमोज खाण्याला तरुणांची पसंती असते. यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि वेगवेगळे स्टफींग असलेले मोमोज सध्या बाजारात मिळतात. भाज्या घातलेले, पनीर, टोफू, मशरुम आणि चीज यांचा वापर करुन हे मोमोज बनवले जातात. इतकेच नाही तर नॉनव्हेजमध्येही मोमोजचे बरेच प्रकार पाहायला मिळतात. सध्या बाहेर खायचे प्रमाण वाढले असल्याने चौकाचौकात वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल्स आपण पाहतो. या प्रत्येक स्टॉलची काही ना काही खासियत असते. तिथली टेस्ट, त्यांची पदार्थ बनवण्याची पद्धत, ग्राहकांची घेतली जाणारी काळजी यामुळे खाण्याचा एखादा स्टॉल कमी वेळात प्रसिद्ध होतो. मुंबईमध्ये मोमोजचा एक स्टॉल असाच प्रसिद्ध आहे. आता तो प्रसिद्ध असण्याचे कारण आहे ते म्हणजे हा स्टॉल चालविणारा व्यक्ती.

मिरा रोड याठिकाणी असलेला हा सटॉल ७० वर्षांचे आजोबा चालवतात. विशेष म्हणजे या वयातही त्यांच्यातील उत्साह आणि काम करण्याची त्यांची पद्धत पाहून आपण सगळेच थक्क होतो. टम्मी टिकलर मोमोज असे त्यांच्या स्टॉलचे नाव असून हे आजोबा अतिशय हसत आणि आनंदाने आपले काम करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. हातातील डिश देताना त्यांचा हात काहीसा थरथरतानाही दिसतो. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरुन ते कुठेही थकलेले किंवा वैतागलेले वाटत नाहीत. त्यामुळे या वयातही त्यांची काम करण्याची असलेली जिद्द आपल्याला बळ देते. अतिशय घाईने गरमागरम मोमोज काढून त्यावर चटणी घालून ते ग्राहकांना देत असल्याचे दिसते. इतकेच नाही तर रस्त्यावरचे स्टॉल म्हटल्यावर या स्टॉलवर साधारणपणे अस्वच्छता असते. मात्र या आजोबांच्या स्टॉलवर स्वच्छता असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. 


इन्स्टाग्रामवर बॉम्बे फूडी टेल्स या पेजवर त्यांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून नेटीझन्सची त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांत अडीच हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी त्यांना प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या वयात काम करत असल्याने अनेकांनी त्यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले आहे, तर बरेच जण हे मोमोज टेस्ट करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांच्या हार्डवर्कचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळे या वयातही त्यांची असलेली चिकाटी आणि काम करण्याची ताकद अनेकांसाठी प्रेरणा ठरणारीच आहे. 

Web Title: Crowds of Mumbaikars eat momos from 70-year-old grandfather's hand, watch the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.