Join us  

'तो' गेला, पण आम्ही आहोत!- शहीद जवानाच्या बहिणीच्या लग्नात CRPF जवानांनी निभावलं भावाचं कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 1:16 PM

Social viral: लग्न म्हणजे प्रत्येक मुलीसाठी भावनिक क्षण... पण ज्या लग्नात चक्क CRPF जवान येतात आणि नवरीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहतात, त्या लग्नाची तर गोष्टच वेगळी...

ठळक मुद्देएक भाऊ गेला, पण त्याच्या जागी उभे राहिलेले हे अनेक भाऊ बघून ज्योतीसह कुटूंबाला आणि सगळ्या पाहुण्यांनाच भावना आवरणे अवघड झाले होते.

सोशल मिडियावर (social media) सध्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची चांगलीच चर्चा सुरू आहे.. पहाडी छाती घेऊन सीमेवर शत्रूशी लढण्यासाठी कायम सज्ज असणाऱ्या कणखर सैनिकांचं हळूवार, काेमल मन या निमित्ताने उत्तर प्रदशातील रायबरेली येथील नागरिकांनी पाहिलं... (emotional story of a marriage) आपला मित्र शहीद झाला. त्याच्या कुटूंबियांसाठी तर हा धक्का खूप मोठा आहे.. पण तरीही या दु:खाची सल काही प्रमाणात तरी कमी व्हावी आणि त्याच्या बहिणीच्या लग्नात कशाचीही उणीव जाणवू नये, यासाठी ते सगळे सैनिक सरसावले आणि लग्नमंडपात जातीने उभे राहिले...

 

रायबरेली (Raibareli) येथील शैलेंद्र प्रताप सिंह (Shailendra Pratap Singh) हे २००८ पासून भारतीय सैन्यात दाखल झाले होते. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा (Kashmir, Pulwama) येथील लेथपुरा येथे CRPF च्या ११० बटालियनमध्ये शिपाई म्हणून कर्तव्य बजावत असताना ५ ऑक्टोबर २०२० रोजी दहशतवाद्यांशी सामना करताना ते शहीद झाले. घटनेला वर्ष उलटून गेलं तरी कुटूंबाला हा धक्का पचवणं कठीण होतं. अशातच घरात शैलेंद्र यांची बहिण ज्योती सिंह हिचं लग्न ठरलं. १३ डिसेंबर रोजी हा विवाह झाला. या दिवशी ज्योतीसह सगळ्या कुटूंबालाच शैलेंद्र यांची तिव्रतेने आठवण येत होती. पण अचानकच लग्न मंडपात CRPF चे जवान हजर झाले आणि भाऊ म्हणून शैलेंद्र यांनी बहिणीच्या लग्नात जे काही केले असते, ते सगळे विधी, कार्य या सैनिकांनी पार पडले. फुलांच्या मंडपाखालून नवरीला स्टेजवर आणण्यापासून ते ज्योतीची बिदाई करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या सैनिकांनी अतिशय जबाबदारीने केल्या.

 

https://twitter.com/KOSCRPF/status/1470663249519525888?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1470663249519525888%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Findianexpress.com%2Farticle%2Ftrending%2Ftrending-in-india%2Fgone-but-not-forgotten-crpf-jawans-turn-up-at-slain-soldiers-sisters-wedding-7673712%2F

 

एक भाऊ गेला, पण त्याच्या जागी उभे राहिलेले हे अनेक भाऊ बघून ज्योतीसह कुटूंबाला आणि सगळ्या पाहुण्यांनाच भावना आवरणे अवघड झाले होते. शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांना आधार देणाऱ्या आणि शहीदांच्या कुटूंबालाही आपले मानून कर्तव्य बजावणाऱ्या या सैनिकांचे सर्वच स्तरावरून कौतूक होत आहे. माझा मुलगा या जगात नाही. पण या जवानांच्या रूपाने मला नवे पुत्र मिळाले आहेत, अशा भावना शहीद शैलेंद्र प्रताप सिंह यांच्या वडीलांनी व्यक्त केल्या.  

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्नपुलवामा दहशतवादी हल्ला