चैताली मेहेंदळे
शिव्या देणे ही काही नवीन गोष्ट नाही. रागात भावना तीव्रपणे व्यक्त करण्यासाठी वर्षानुवर्षे लोकं शिव्यांचा वापर करत आले आहेत. त्याकडे आपणही फारसं लक्ष देत नाही. पण जर नीट लक्ष देऊन ऐकलं तर प्रत्येक शिवीही महिलेशी निगडीत असते.(cursing and talking vulgar is funny now?.. do we need dark comedy?) म ते भ सगळंच महिलांबद्दल. असं का? पूर्वीपेक्षा आत्ता शिव्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचे कारण म्हणजे जेवढी फालतू बडबड कराल तेवढे तुम्ही कुल असता. हे कुल , सॅवेज बनण्याच्या नादात ही मुलं काहीही बरळतात. आजकाल बोल्ड आणि डॅशिंग मुलगीही तिच असते जी शिव्या देते. (cursing and talking vulgar is funny now?.. do we need dark comedy?)तरुणांना अश्लील बडबड करणं विनोदी वाटतं. ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
एखाद्याच्या व्यंगाबद्दल बोलणं, मुलींच्या स्तनांच्या आकाराबद्दल बोलणं याला विनोद समजलं जातं. (cursing and talking vulgar is funny now?.. do we need dark comedy?)ही बदललेली मानसिकता प्रचंड भयंकर आहे. मध्यंतरी कळलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामवर बलात्कार कसा करावा? हे सर्च करणाऱ्यांची संख्या लाखात आहे. बदललेली मानसिकता याला कारणीभूत आहे.
सध्या अशाच काही कमेंट्समुळे रणवीर अलाहाबादिया चांगलाच पेचात सापडला आहे. समय रैनाने त्याच्या पेजवरून इंडियाज गॉट लॅटेंटचे सगळेच भाग काढले आहेत. प्रकरण चिघळतचं चाललं आहे. सोशल मिडियावर पापा की परी, हॉट स्टफ, इतर नावांनी मुलींना संबोधलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे बऱ्याच मुलींना त्या कमेंट आवडतात. अनेक मुलांना स्वत:च्या आईवडीलांवर जोक मारणंही फनी वाटते. त्याला ते अनफिल्टर्ड किंवा डार्क कॉमेडी असं म्हणतात.
रोस्ट करणं याला नवीन कुल मामला म्हणून स्वीकारलं जाऊ लागलं आणि अपमानाला विनोद म्हणणं सुरु झालं. इतरांना ठेवलेली नावं ऐकून लोकं हसून टाळ्या वाजवतात. डार्क कॉमेडी हा प्रकारही पाश्चात्य आहे. मॉडर्नायझेशनच्या नावाखाली तेही आपल्याकडे आले.
रोजच्या जगण्यातही अनेकजण सतत शिव्या देऊनच बोलतात. त्याचे त्यांना काहीही वाटत नाही. तेच या कार्यक्रमांचेही. असे रोस्ट करणारे, अश्लिल शब्द आणि शिवीगाळ असणारे कार्यक्रम करणारे कमी आणि पाहणारेच जास्त आहेत.
मात्र या अश्लील संवादांचा मनावर, मेंदूवर नक्कीच परिणाम होतो. विचारही हळूहळू तसेच होत जातील. बॉडीशेमिंग, ट्रोलिंग, मुलींबद्दल अश्लील कमेंट्स, आईवडीलांवरचे विनोद, पॉर्न या गोष्टी नॉर्मलाइझ करण्याचा प्रयत्न कंटेन्ट क्रिएटरर्स , इंन्फ्लूएन्सर्स करत आहेत. पण ते विषय चुकीचेच आहेत यात वाद नाही. त्यात काही कूल नाही. आपण विनोदाच्या नावाखाली नक्की काय स्वीकारतो आहोत याचा विचार करायला हवा.