रॅप बिट्ससाठी प्रसिद्ध असणारा गायक, संगीतकार यशराज मुखाते (Yashraj Mukhate's rap bits) याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. कमी कालावधीत त्याने त्याचे जबरदस्त फॅन फॉलोईंग तयार केले आहे. अगदी चिमुकल्या मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच त्याचे व्हिडिओ बघायला आवडतात. लाईट मूडमध्ये तयार केलेले हे व्हिडिओ खरोखरंच अतिशय विनाेदी (funny video) आणि नाविन्यपूर्ण असतात. त्यामुळेच तर त्याचा व्हिडिओ साेशल मिडियावर अपलोड होताच तो बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांची धडपड सुरू असते.
काही महिन्यांपूर्वी यशराजने पाकिस्तानी तरुणीच्या एका व्हिडिओवर रॅप बिट्स तयार केले होते. "और यहाँ पे पार्टी हो रही है..." असं ते म्युझिक होतं.
केस कोरडे होऊन केसांना फाटे फुटले? 5 उपाय, केस होतील मऊ- मुलायम
यात ती मुलगी आणि ती "पार्टी" या शब्दाचा "पारवी" असा वेगळ्याच पद्धतीने करत असलेला उच्चार नेटीझन्सला भारीच आवडला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्हिडिओसारखेच अनेक व्हिडिओ अक्षरश: घराघरात तयार झाले आणि त्यापैकी बरेच व्हिडिओ हौशी नेटिझन्सनी सोशल मिडियावरही अपलोड केले. अगदी ३- ४ जण एकत्र आले तरी "ये मै हू... ये मेरे दोस्त है.. और यहाँ पे पार्टी हो रही है..." असा सूर अगदी कॉलेजच्या कट्ट्यांपासून ते घरातल्या छोटेखानी पार्ट्यांमध्येही ऐकू येत होता..
आता असाच एक मस्त मजेदार व्हिडिओ छोट्याशा बहिण- भावाने मिळून तयार केला आहे. shehyas या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात जी मुलं दिसत आहेत ती साधारण ५- ७ वर्षांची असावीत. या व्हिडिओचा सगळ्यात मजेदार भाग म्हणजे त्यातली मुलगी तर सांगतेय की ये मेरा भाई है... पण तो भाऊ मात्र पुढचं वाक्य बोलायचंच विसरून जातो. बहिण दोन वेळा त्याला हळू आवजात सांगते, मग कुठे त्याच्या लक्षात येतं आणि तो पुढचं वाक्य बोलतो. व्हिडियोला यशराजनेही कमेंट केली असून तो व्हिडिओ त्याने अनेकदा पाहिला. दोघेही बहिण- भाऊ खूपच क्यूट आहेत, असं तो म्हणाला आहे.