लहान मुलींचा भातुकलीचा खेळ मोठा बघण्यासारखा असतो. त्यांना डिस्टर्ब होणार नाही, अशा पद्धतीने दूरवर उभे राहून त्यांचा खेळ नुसताच बघत बसणे, हे खरोखरच खूप रमणीय असतं. आपल्या कळत- नकळत ही मुलं घरातल्या मोठ्या मंडळींचं निरिक्षण करत असतात, मोठ्यांची वागणूक बारकाईने बघतात आणि मग भातुकलीच्या खेळात त्याचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. असंच आपल्या आईचं अनुकरण करून आईसाठीच छान छान चहा- कॉफी (tea and coffee) करून देणारी ही चिमुकली सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे.(Cute little girl preparing tea for her mom)
जेमतेम ३ ते ४ वर्षांच्या असणाऱ्या या अतिशय गोड मुलीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्याsaruh2themax या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
नविन बूट, सॅण्डल चावत असतील, तर करा 4 उपाय, चावरे बूट होतील आरामदायी
ही मुलगी आणि तिची आई या नेमक्या कोणत्या देशातल्या आहेत, याचा काही अंदाज त्या व्हिडिओवरून येत नाही. पण व्हिडिओ मात्र जबरदस्त व्हायरल झाला आहे. जवळपास अडीच लाख लोकांनी त्याला लाईक केलं आहे. कोणत्याही घरात जिथे लहान मुली भातुकलीचा खेळ खेळत असतील, तसाच हा व्हिडिओ आहे. पण त्या मुलीच्या निरागस हास्याने, तिच्या बोलक्या हावभावाने हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे.
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की ती मुलगी सुरुवातीला आईला तिला काय पाहिजे असं विचारते आहे. तिने असं विचारताच आईने तिला चहा दे म्हणून सांगितलं.
केस खूपच पातळ झाले? केमिकल्स असणारे हेअर प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा करा ५ घरगुती उपाय
या मुलीच्या आजूबाजूला तिचा खेळण्यातला किचन सेट आहे. त्या सेटमधली वेगवेगळी भांडी वापरून मुलगी आईसाठी चहा करते. मध्येच एकदा काही तरी शोधाशोध करताना आपण नेमकं काय करतो आहोत, हेच विसरून जाते. मग आईने पुन्हा एकदा आठवण दिल्यावर ती आईसाठी चहा सर्व्ह करते. चहा सर्व्ह करण्याची तिची पद्धतही अगदी वेगळी असून बघतच रहावेत, इतके गोड तिचे हावभाव आहेत.