सायकल किंवा बाईक चालवताना वेगवेगळे स्टंट (stunt on bicycle) करणारे मुलं आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला बघत असतो. कुणी बाईकची स्पीड खूपच वाढवतं आणि झिगझॅग करता वाकडीतिकडी गाडी चालवतं, तर कुणी बाईकचं पुढचं चाक एका झटक्यात वर उचलून घेतं. सायकल चालविताना कुणी त्यावर उभं राहतं तर कुणी दोन्ही हात सोडून भन्नाट सायकल चालवतं. हे असे स्टंट आपण पाहिलेले असतात किंवा ऐकलेले असतात. पण इथे तर या एका मुलीने कमालच केली आहे. सायकलवरचे स्टंट (cycle stunt of a woman) करण्यात मुलीही मागे नाहीत, हेच तिच्या अजब- गजब तऱ्हेवरून दिसून येतं.
सायकलवर अनोख्या पद्धतीने स्टंट करणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral video) झाला आहे. अवघ्या ५ ते ६ सेकंदाचा हा व्हिडिओ. पण तरीही तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. @MorissaSchwartz या ट्विटर हॅण्डलवरून शेअर झालेला हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला आहे. अवघ्या ४ ते ५ तासांपुर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल 105.6K एवढ्या लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ परदेशातला आहे. त्यामध्ये असं दिसत आहे एक महिला सायकल चालवते आहे. तिच्या वाटेत मध्येत आडवा खांब येतो. आता ती थोडं डाव्या बाजूला सरकली असती तर तिला एवढी कसरत करण्याची काहीच गरज नव्हती. पण तिने तसं केलं नाही.
Can you do that too?? 🧐pic.twitter.com/OCXvx1ZFOw
— Morissa Schwartz (Dr. Rissy) (@MorissaSchwartz) June 22, 2022
ती खांब मध्ये आल्यावर सायकल चालवत असतानाच मोठ्या खुबीने खाली वाकली. एवढंच नाही तर ती अशाच पद्धतीने वाकून पुढच्या सीटवरून मागच्या सीटवर गेली. हे करत असतानाच तिने अतिशय सफाईदार पद्धतीने सायकल गोलाकार फिरवली आणि अलगद खांब ओलांडून पुढे आली. हे एवढं सगळं तिने अवघ्या ३ ते ४ सेकंदात केलं असून ती नेमकं काय करतेय, हे चटकन लक्षातच येत नाही. तिचा स्टंट खरोखरंच अनेकांना आवडला आहे. पण असे स्टंट करताना हेल्मेट घालणं गरजेचं आहे, उगाच जीव धोक्यात घालू नये, अशा सुचनाही तिला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.