Lokmat Sakhi >Social Viral > सोमणआजी 83 व्या वर्षी सायकलवर सुसाट, बघा मिलिंद सोमणच्या आईची कमाल..

सोमणआजी 83 व्या वर्षी सायकलवर सुसाट, बघा मिलिंद सोमणच्या आईची कमाल..

Fitness of Usha Soman: अभिनेता मिलिंद सोमण तर फिट आहेच, पण त्याच्या ८३ वर्षांच्या आईपण या वयात कसल्या कमालीच्या फिट आहेत, हे पाहायचे असेल तर त्यांचा हा सायकलिंगचा व्हायरल व्हिडिओ (viral video of Usha Soman) एकदा बघाच.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 04:24 PM2022-03-29T16:24:29+5:302022-03-29T16:27:34+5:30

Fitness of Usha Soman: अभिनेता मिलिंद सोमण तर फिट आहेच, पण त्याच्या ८३ वर्षांच्या आईपण या वयात कसल्या कमालीच्या फिट आहेत, हे पाहायचे असेल तर त्यांचा हा सायकलिंगचा व्हायरल व्हिडिओ (viral video of Usha Soman) एकदा बघाच.... 

Cycle riding video of 83 years old Usha Soman, Amazing fitness of Milind Soman's mother, Watch video | सोमणआजी 83 व्या वर्षी सायकलवर सुसाट, बघा मिलिंद सोमणच्या आईची कमाल..

सोमणआजी 83 व्या वर्षी सायकलवर सुसाट, बघा मिलिंद सोमणच्या आईची कमाल..

Highlightsआजींनी चक्क २५ वर्षांनंतर सायकल हातात घेतली आहे. सोमण आजींचा हा व्हिडिओ बघा आणि स्वत:ला रिफ्रेश करा...

मिलिंद सोमणचं नाव घेतलं की त्यामागोमाग त्याच्या फिटनेसचा उल्लेख करावाच लागतो.  त्याशिवाय त्याची  ओळख कशी पुर्ण झाल्यासारखी वाटतच नाही. मिलिंदचा हा फिटनेसचा गुण त्याच्या आईकडूनच आलेला  असणार हे निश्चित. कारण त्या देखील कमालीच्या फिट असून कधी squats तर planks करून त्या नेहमीच  अचंबित करत असतात. आता मिलिंदने नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केला असून यामध्ये तर त्याच्या आईने खरोखरंच कमाल केली आहे. त्यांचा फिटनेस पाहून त्यांच्या वयाचेच काय पण विशी, तिशीतले तरुणही लाजतील... 

 

मिलिंदने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याच्या ८३ वर्षांच्या आई उषा सोमण या चक्क सायकल चालवताना  दिसत आहेत. ते दोघेही सध्या गोव्याला गेलेले आहेत. तिथल्या एका सुंदर बीचवर सोमण आजी मिलिंदच्या मदतीने सायकल राईड करताना दिसत आहेत. त्याच्या पोस्टवरून असं लक्षात येतंय की आजींनी चक्क २५ वर्षांनंतर सायकल हातात घेतली आहे. पण असं असतानाही त्यांनी जी काही सायकल सुसाट पळवली आहे, ते पाहून खरोखरंच त्यांचं खूप कौतूक वाटतं.. Aai cycling after about 25 years ! Keep doing what you love but practice regularly 😛 not bad for 83 years 😀.... असं म्हणून त्याने आपल्या आईचं कौतूक केलंय.. 

 

आजकाल वयाची चाळिशी ओलांडली तरी अनेक जणी एखादी नवी गोष्ट करायला घाबरतात. कुणाला दुचाकी चालवायची तर कुणाला चारचाकी चालवायची भीती वाटते. आता आपलं वय झालंय.. आता कसं काय जमणार बुवा... असा बुरसटलेला, जुनाट विचार चुकून जरी तुमच्या मनाला शिवला तर लगेचच सोमण आजींचा हा व्हिडिओ बघा आणि स्वत:ला रिफ्रेश करा...

 

सायकलिंग करण्याचे फायदे...(benefits of cycling)
१. सायकलिंग हा एक कम्प्लिट व्यायाम म्हणून ओळखला जातो.
२. बॉडी टोनिंगसाठी उपयुक्त
३. वेटलॉससाठी उपयुक्त व्यायाम
४. श्वसनक्रिया सुधारते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
५. एकाग्रता वाढते. 
 

Web Title: Cycle riding video of 83 years old Usha Soman, Amazing fitness of Milind Soman's mother, Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.