Join us  

'आता याचं कोणीच बिघडवू शकत नाही'! पोराला नजर लागू नये म्हणून आजींचा जुगाड, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:54 PM

Viral Video : हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'या मुलाचे कोणी काय बिघडवू शकते.'

सोशल मीडियावर आई-वडील आणि आजी-आजोबांचे लहान मुलांसोबतचे प्रेमळ व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. मुलांसोबचे प्रेमळ व्हिडिओ पाहून अनेक वेळा लोकांच्या डोळ्यात पाणी येते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आजीचे एका लहान मुलावरचे प्रेम दाखवण्यात आले आहे. (Dadi was doing such act for keep away evil eye of a child internet loves)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आजी जेवण बनवत आहे, सोबतच ती तिच्या शेजारी बसलेल्या मुलाची नजर काढते आहे, जेणेकरून त्याचे कोणीही वाईट करू नये. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुमचेही मन जिंकेल. (Dadi was doing such act for keep away evil eye of a child internet loves it see cute viral video) या व्हिडिओतून भाबड्या आजीला चिमुरड्याची असलेली काळजी, प्रेम दिसून येत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वृद्ध आजी आणि एक मूल दोघेही बसलेले दिसत आहेत. आजीही शेजारी जळणाऱ्या चुलीवर अन्न शिजवत आहे आणि त्याचवेळी समोर बसलेल्या मुलाची नजर काढते. प्रत्येक वाईट नजर या मुलापासून दूर राहावी म्हणून आजी मुलाचे मुलाची कशा पद्धतीनं नजर काढते ते तुम्ही पाहू शकता. 

किचन सिंकमध्ये चुकूनही फेकू नका ५ गोष्टी; पाईप ब्लॉक होऊन पाणी कधी तुंबेल कळणारही नाही

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'या मुलाचे कोणी काय बिघडवू शकते.'  हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे. आजीचे हे प्रेम पाहून सगळेच भावूक झाले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर  लोक खूप कमेंट करत आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया