Join us  

‘ते’ म्हणतात दही पुरी म्हणजे सगळ्यात वाईट भारतीय स्ट्रीट फूड; तुम्हाला पटतंय का हे म्हणणं…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 2:18 PM

Dahi puri papri Chaat in the list of worst rated Indian Street Food according to taste Atlas : दही पुरी, पापडी चाट हे स्ट्रीट फूड चवीला सगळ्यात वाईट असं सांगणारा एक अहवाल, हे कितपत खरं म्हणावं?

दही पुरी, पापडी चाट किंवा चाटचे एकूणच कोणतेही पदार्थ म्हणजे आपल्या जीभेचे चोचले पुरवणारे बेस्ट पदार्थ. कधीही पाणीपुरी खाण्याची तल्लफ आली की आपण नाक्यावरच्या ठेल्यावर जातो आणि मनसोक्त पाणीपुरी खाऊन येतो. इतकंच काय मित्रमंडळी भेटलो की तर आपण भेळ, दही पुरी, एसपीडीपी, रगडा पुरी यांसारख्या पदार्थांवर अक्षरश: ताव मारतो. चाटचे आंबट गोड असलेले हे पदार्थ म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय आवडीचा प्रकार. चिंचेची चटणी, तिखट चटणी, भरपूर शेव आणि फरसाण या सगळ्याचे कॉम्बिनेशन असलेले हे पदार्थ कितीही खाल्ले तरी पोट भरत नाही. हे पदार्थ घरात किंवा हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा ते रस्त्यावर उभे राहून खाण्यात जी मज्जा असते ती कशातच नाही. म्हणूनच या पदार्थांना स्ट्रीट फूडच्या यादीत घालण्यात येतं (Dahi puri papri Chaat in the list of worst rated Indian Street Food according to taste Atlas). 

(Image : Google)

आपण अतिशय आवडीने आणि चवीने खात असलेले हे पदार्थ मात्र सर्वात वाईट भारतीय पदार्थ म्हणून ओळखले जातात. टेस्ट अॅटलसच्या मते महाराष्ट्रात अतिशय आवडीने खाल्ली जाणारी दही पुरी १० सर्वात वाईट रेट असलेल्या भारतीय स्ट्रीट फूडच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. टेस्ट अॅटलस हे पारंपरिक पाककृती आणि या पाककृतींच्या समिक्षा, लोकप्रिय पदार्थ आणि खाण्याविषयीचे विविध संशोधन पेपर संकलित करणे यासाठी ओळखले जाते. नुकतेच त्यांनी भारतीय स्ट्रीट फूडची यादी संकलित केली. यामध्ये त्यांनी भारतात रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांचा अभ्यास केला. 

(Image : Google)

या पदार्थांमध्ये सगळ्यात वाईट असलेल्या १० पदार्थांची यादी त्यांनी जाहीर केली. ज्यामध्ये महाराष्ट्रातील दही पुरी हा चाट अव्वल स्थानावर आहे. मध्य प्रदेशची शेव आणि गुजरातच्या दाबेलीने या यादीत दुसरे स्थान पटकावले. याबरोबरच पापडी चाट, अंडा भुर्जी, दही वडा, साबुदाणा वडा या इतर पदार्थांचाही या यादीत समावेश होता. पंजाबमधील गोबी पराठा यादीत नवव्या स्थानावर आहे आणि दक्षिण भारतातील बोंडा किंवा बटाटा बोंडा म्हणून ओळखला जाणारा बटाटा-आधारित तळलेला स्नॅक यामध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे.

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न