Lokmat Sakhi >Social Viral > नऊवारी नेसून आजीबाईंनी फोडली दहीहंडी! पाहा महिलांची भन्नाट दहीहंडी, व्हायरल व्हिडिओ

नऊवारी नेसून आजीबाईंनी फोडली दहीहंडी! पाहा महिलांची भन्नाट दहीहंडी, व्हायरल व्हिडिओ

Dahihandi Celebration by Women: कृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला यानिमित्ताने व्हायरल झालेला हा व्हिडिओ (viral video of women's dahihandi) एकदा बघायलाच हवा... ही अनोखी दहीहंडी सध्या सोशल मिडियावर धूम करते आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 01:57 PM2022-08-20T13:57:06+5:302022-08-20T14:17:53+5:30

Dahihandi Celebration by Women: कृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला यानिमित्ताने व्हायरल झालेला हा व्हिडिओ (viral video of women's dahihandi) एकदा बघायलाच हवा... ही अनोखी दहीहंडी सध्या सोशल मिडियावर धूम करते आहे.

Dahihandi Viral Video: Grand mother broke dahihandi, Dahihandi celebration by women  | नऊवारी नेसून आजीबाईंनी फोडली दहीहंडी! पाहा महिलांची भन्नाट दहीहंडी, व्हायरल व्हिडिओ

नऊवारी नेसून आजीबाईंनी फोडली दहीहंडी! पाहा महिलांची भन्नाट दहीहंडी, व्हायरल व्हिडिओ

Highlightsमहिलांनी दहीहंडी फोडल्याचे आपण अनेक ठिकाणी बघितलेही आहे. पण या व्हिडिओतली दहीहंडी आणि ती फोडणाऱ्या आजीबाई मात्र नेटकरींना भन्नाट आवडल्या आहेत. 

कृष्ण जन्म सोहळा आणि त्यानंतरचा दहीहंडी आणि गोपाळ काल्याचा (dahi handi and gopal kala) कार्यक्रम म्हणजे जणू उत्साहाला आलेले उधाण असते. आता फक्त मुंबईतच नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. एकावर एक मानवी मनोरे रचून फोडण्यात येणाऱ्या दहीहंडीचे दृश्य बघणे हा खरोखरंच अतिशय रोमांचकारी क्षण आहे. आता गोविंदांच्या बरोबरीने महिलांचे दहीहंडी पथकही पुढे येत आहेत. महिलांनी (Dahihandi celebration by women) दहीहंडी फोडल्याचे आपण अनेक ठिकाणी बघितलेही आहे. पण या व्हिडिओतली दहीहंडी आणि ती फोडणाऱ्या आजीबाई (women in 9 yard saree broke dahi handi) मात्र नेटकरींना भन्नाट आवडल्या आहेत. 

 

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे, याची काही माहिती उपलब्ध नाही. पण सध्या दहीहंडीच्या निमित्ताने मात्र सोशल मिडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हारयल झाला आहे. स्टार मराठीच्या फेसबूक पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की महिलांनी ३ थरांचा मनोरा रचून ही दहीहंडी फोडली. सर्वात वर दहीहंडी फोडणाऱ्या ज्या आजीबाई आहेत, त्यांच्या नऊवारीवरून आणि केसांत माळलेल्या गजऱ्यावरून असा अंदाज दिसतो की हा व्हिडिओ नक्कीच कोकणातला असावा. कारण कोकणात गजरे किंवा फुलं माळण्याची जी पद्धत आहे, त्याप्रमाणेच अनेकींनी गजरे माळले आहेत.

 

या व्हिडिओचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मानवी मनोऱ्यामध्ये सहभागी झालेल्या महिलांची वेशभुषा. यासाठी त्यांनी कोणतेही बडेजाव करणारे कपडे घातलेले नाहीत.

८६ वर्षांच्या आजीबाईंची कमाल, इतक्या चपळाईने सुसाट केलं स्केटिंग की ते पाहूनच नेटकरी म्हणाले....

अगदी रोजच्या कपड्यांत म्हणजेच सहावारी, नऊवारी साडी नेसून महिला यात सहभागी झाल्या आहेत. सगळ्यात वर चढताना आजीबाईंना बरीच मेहनत घ्यावी लागली. उभे राहिल्यानंतर आणि दहीहंडी पकडताना अनेकदा त्यांचा तोल जातो की काय, असेही बघणाऱ्याला वाटते. पण त्यांनी मात्र मोठ्या कौशल्याने आणि अगदी ऐटीत एक- दोन झटक्यातच दहीहंडी फोडली आणि मग इतर सगळ्या महिलांनी एकच आनंदोत्सव साजरा केला. 

 

Web Title: Dahihandi Viral Video: Grand mother broke dahihandi, Dahihandi celebration by women 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.